Subrata Roy dies: सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन; मुंबईमध्ये घेतला अखेरचा श्वास

Subrata Roy dies
Subrata Roy dies
Updated on

नवी दिल्ली- सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. सुब्रत रॉय यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचे पार्थीव उद्या लखनऊमध्ये आणले जाईल. येथे त्यांना अखेरची श्रद्धांजली दिली जाईल. (Sahara Group chief Subrata Roy dies of cardiorespiratory arrest)

रॉय यांनी आपली सुरुवात गोरखपूरमधून केली होती

सुब्रत रॉय यांचा जन्म १० जून १९४८ रोजी बिहारच्या अररिया जिल्ह्यात झाला होता. त्यांचे वडिलांचे नाव सुधीर चंद्र रॉय आणि आईचं नाव छवी रॉय होतं. कोलकातामध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोरखपूरमध्ये एका सरकारी कॉलेजमधून यंत्र अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले होते. त्यांनी आपला उद्योग गोरखपूरमधूनच सुरु केला होता.

Subrata Roy dies
Sahara Refund Portal: सहारा रिफंड पोर्टल सुरु, गुंतवणूकदारांना मिळाले त्यांचे पैसे

शुन्यापासून साम्राज्य निर्माण केलं

सुब्रत यांना ओळखणारे लोक सांगतात की ते ७० च्या दशकामध्ये स्कूटर चालवायचे. त्यावेळी दिवसभरात १०० रुपये कमावणारे लोक त्यांच्याकडे २० रुपये जमा करायचे. अशाप्रकारे लोकांकडून छोटी छोटी रक्कम गोळा करुन त्यांनी साम्राज उभं केलं. १९७८ मध्ये सहाराची सुरुवात करताना त्यांच्या खिशामध्ये फक्त २००० रपये होते. छोट्या शहरातून व्यवसाय सुरु करुन त्यांनी जगभरात आपल्या व्यवसाय पसरवला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.