Sahara Refund: CRCS सहारा रिफंड पोर्टलवर दावा करण्याची शेवटची तारीख कोणती, कधी मिळतील पैसे?

Sahara Refund Portal: सहारा सोसायटीमध्ये वर्षानुवर्षे पैसे अडकलेले सर्व ठेवीदार पोर्टलद्वारे पैशांवर दावा करू शकतात.
Sahara Refund Portal
Sahara Refund PortalSakal
Updated on

Sahara Refund Portal: सहारा सोसायटीमध्ये अडकलेल्या पैशांच्या वसुलीसाठी सरकारने 18 जुलै रोजी CRCS सहारा रिफंड पोर्टल सुरू केले आहे. सहारा सोसायटीमध्ये वर्षानुवर्षे पैसे अडकलेले सर्व ठेवीदार या पोर्टलद्वारे ठेवीवर दावा करू शकतात.

जर तुम्ही देखील त्याचे ठेवीदार असाल, तर तुम्ही या पोर्टलवर नोंदणी करून तुमची रक्कम मिळवू शकता. चार सोसायट्यांचे ठेवीदार या पोर्टलवर दावा करू शकतात.

कोण दावा करू शकतो?

सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लखनऊ, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कोलकाता, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड भोपाळ आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हैदराबादचे ठेवीदार या पोर्टलद्वारे परताव्याचा दावा करू शकतात.

Sahara Refund Portal
Gautam Adani: गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींना झाली डील

दावा कसा करू शकता?

परतावा मिळविण्यासाठी ठेवीदारांना प्रथम CRCS सहाराच्या रिफंड पोर्टलला भेट देऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. पुढे तुम्हाला डिपॉझिटर लॉगिन वर क्लिक करावे लागेल आणि नंतर तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर Get OTP वर क्लिक करून तुम्हाला येथे OTP टाकावा लागेल.

Sahara Refund Portal
Share Market Today: बाजारातील सतत घसरणीच्या काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

परताव्याचा दावा करण्याची अंतिम मुदत काय?

सरकारने ठेवीदारांना CRCS सहाराच्या रिफंड पोर्टलवर दावा करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. तुम्हाला पाहिजे त्या तारखेपर्यंत तुम्ही या पोर्टलवर तुमच्या परताव्याचा दावा करू शकता.

लक्षात ठेवा की जर तुमची दाव्याची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच आधार लिंक मोबाईल क्रमांक आणि बँक खाते असणेही आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही पोर्टलवर परताव्यासाठी दावा करू शकत नाही.

Sahara Refund Portal
Morgan Stanley: भारत ड्रॅगनला टाकणार मागे! मॉर्गन स्टॅन्लेने भारताच्या रेटींगमध्ये केली वाढ तर चीनला धक्का

पैसे कधी मिळतील?

महत्त्वाचे म्हणजे, परताव्याचा दावा केल्यानंतर, तुमच्या सर्व माहितीची पडताळणी केली जाईल. अधिकृत CRCS 15 दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करेल आणि आधारशी जोडलेल्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करेल. या संपूर्ण प्रक्रियेला एकूण 45 दिवस लागू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()