निवड विवरणपत्राची

नेमेचि येतो मग पावसाळा! या उक्तीप्रमाणे आता पगारदार करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरायचा? विवरणपत्रातील माहितीत काही बदल झाले आहेत का?
निवड विवरणपत्राची
निवड विवरणपत्राचीsakal
Updated on

नेमेचि येतो मग पावसाळा! या उक्तीप्रमाणे आता पगारदार करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरायचा? विवरणपत्रातील माहितीत काही बदल झाले आहेत का? कोणती नवी माहिती द्यावी लागणार आहे का? अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे की त्यात काही बदल झाला आहे? असे अनेक प्रश्‍न अनेकांना भेडसावू लागले आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेणे प्रत्येक करदात्यासाठी आवश्‍यक आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) २४ जानेवारी रोजी एक अधिसूचना काढून करआकारणी वर्ष २०२४-२५ साठी प्राप्तिकर विवरणपत्राचे अर्ज अधिसूचित केले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने विविध गटांतील करदात्यांसाठी लागू होणाऱ्या निकषांमध्ये आणि विवरणपत्र भरण्याच्या पद्धतींमध्ये काही बदल केलेले नाहीत. आकारणी वर्ष २०२४-२५ साठी विवरणपत्र भरण्यासाठीचा अर्ज (फॉर्म) आकारणी वर्ष २०२३-२४ साठी जसा होता तसाच आहे. पन्नास लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनी फॉर्म १, तर त्यापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास फॉर्म २ भरणे अपेक्षित आहे. त्यापैकी कोणता पर्याय वापरला पाहिजे, हे त्याला मिळालेल्या उत्पन्नांवर ठरेल. खाली दर्शविलेल्या निकषांपेक्षा इतर उत्पन्न असल्यास ही दोन्ही विवरणपत्रे दाखल करता येणार नाहीत. उदा. व्यावसायिक उत्पन्न हे लक्षात घेतले पाहिजे.

पगारदार व्यक्ती वेतनाखेरीज ‘फ्युचर्स व ऑप्शन्स’च्या माध्यमातून उत्पन्न मिळवत असेल, तर ते उत्पन्न व्यापारी उत्पन्न मानले जात असल्याने त्यांना फॉर्म नं.१ व २ दाखल करता येणार नाहीत; तसेच फायदेशीर करप्रणाली निवडीचा पर्यायदेखील फक्त एकदाच वापरता येईल, त्यामुळे काही करदात्यांच्या बाबतीत सद्य करप्रणाली फायदेशीर असूनही, त्यात बदल करता येणार नाही अशी परिस्थिती उद्‍भवू शकते. या गटातील पगारदारवर्गास कोणते विवरणपत्र भरावे? असा संभ्रम असेल, तर ‘आयटीआर २’ भरल्याने नुकसान होणार नाही.

फॉर्म १ किंवा २चे निकष

  • रहिवासी करदात्याचा पगार किंवा निवृत्तिवेतन वा सर्व उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत असल्यास

  • करदात्यास एका घरापासून उत्पन्न मिळत असल्यास (मागील ओढलेला व पुढे ओढण्यात येणारा आर्थिक तोटा सोडून)

  • कौटुंबिक निवृत्तिवेतन मिळत असल्यास

  • इतर स्रोतातून मिळणारे उत्पन्न असल्यास तथापि, विशेष दराने करदायित्व असणारे लॉटरी, घोड्यांच्या शर्यतीचे उत्पन्न किंवा तोटा सोडून

  • परदेश प्रवास करताना दोन लाख रुपयांचा खर्च केल्यास

  • विजेच्या वापरासाठी एक लाख रुपयांचा खर्च केल्यास

  • ‘टीडीएस’ची एकत्रित रक्कम २५,००० रुपये (ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० हजार रुपये) झाल्यास,

  • एका किंवा अधिक बचत खात्यांमध्ये ५० लाख रुपये किंवा अधिक रक्कम भरल्यास

फॉर्म-२चे निकष

निवासी करदात्याचा पगार किंवा निवृत्तिवेतन असल्यास करदाता कोणत्याही कंपनीच्या संचालक असल्यास पात्र स्टार्ट-अपद्वारे वाटप केलेल्या ‘ईएसओपी’च्या संदर्भात प्राप्तिकर भरणे पुढे ढकलण्यात आले असल्यास ज्या व्यक्तीला घरापासून झालेला आर्थिक तोटा मागील ओढलेला असेल वा पुढे ओढावयाचा असल्यास एका घरापेक्षा अधिक घरांपासून उत्पन्न वा तोटा मिळाल्यास, करदात्याने वर्षभरात कधीही असूचिबद्ध शेअर धारण केल्यास, गुंतवणूक/मालमत्ता विकून भांडवली नफा वा तोटा झाल्यास, अनिवासी व लोकांना मिळणारे कुटुंब वेतन इतर स्रोतातून मिळणारे उत्पन्न (विशेष दराने करदायित्व असणारे) लॉटरी,

घोड्यांच्या शर्यतीचे उत्पन्न किंवा तोट्यासह कलम ११५ बीबीडीए अंतर्गत १० लाख रुपयांपेक्षा अधिक मिळणारा लाभांश कलम ११५ बीबीई अंतर्गत स्रोत स्पष्ट नसणारे उत्पन्न (म्हणजे खात्यात भरलेल्या पैशाचा स्रोत, स्रोत स्पष्ट नसणारी गुंतवणूक आदी) ६० टक्के दराने करपात्र उत्पन्न इतर स्रोतातून मिळणारे उत्पन्न (कौटुंबिक निवृत्तीवेतन वजावट सोडून) या शीर्षकाखाली कलम ५७ अंतर्गत करपात्र उत्पन्नासाठी घेतलेल्या वजावटी कलम ८० क्यूक्यूबी किंवा ८०आरआरबी अंतर्गत पेटंट किंवा पुस्तकांमधून मिळालेल्या रॉयल्टीच्या संदर्भात मिळणारी वजावट शेतीतून मिळालेले ५००० पेक्षा अधिक उत्पन्न उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास मागील वर्षातून पुढे आणलेला तोटा कोणत्याही उत्पन्नाच्या बरोबर समायोजित झाल्यास व्यक्तीने मिळविलेले उत्पन्न करपात्र आहे तथापि,

या उत्पन्नावरील ‘टीडीएस’ दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने कापला गेला असल्यास कलम ९०, ९० ए, ९१ अंतर्गत दुहेरी करदायित्वासंदर्भात सवलत मागितल्यास परदेशी स्रोतातून उत्पन्न मिळाल्यास परदेशी कंपनीत काही हितसंबंध वा परदेशी मालमत्ता असल्यास भारताबाहेर सहीचे अधिकार असलेले खाते असल्यास कलम ५ ए नुसार उत्पन्नाचे विभाजन असल्यास कलम १९४ एन अंतर्गत खात्यातून पैसे काढल्याबद्दल करकपात एका किंवा अधिक चालू खात्यांमध्ये एक कोटी रुपये किंवा अधिक रक्कम भरल्यास.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com