Byju’s Bankruptcy: बायजूच्या अडचणीत आणखी वाढ; कंपनीने केला दिवाळखोरीसाठी अर्ज, काय आहे कारण?

Byju’s Bankruptcy: भारतीय स्टार्टअप कंपनी बायजूच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. स्टार्टअपच्या यूएस युनिटने यूएस न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. या युनिटवर 1 अब्ज डॉलर ते 10 अब्ज डॉलर पर्यंतचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.
Salaries delayed, US unit files for bankruptcy
Salaries delayed, US unit files for bankruptcySakal
Updated on

Byju’s Bankruptcy: भारतीय स्टार्टअप कंपनी बायजूच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. स्टार्टअपच्या यूएस युनिटने यूएस न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. या युनिटवर 1 अब्ज डॉलर ते 10 अब्ज डॉलर पर्यंतचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.

बायजू रवींद्रनचे स्टार्टअप बायजू हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्टअपपैकी एक होते. 2022 मध्ये त्याचे मूल्य 22 अब्ज डॉलर होते. बायजूच्या काही गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की, स्टार्टअपचे मूल्यांकन 3 बिलियन डॉलर पर्यंत घसरले आहे.

एक दिवस आधी, गुंतवणूकदारांनी बायजूचे सीईओ बायजू रवींद्रन यांना बोर्डातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता कंपनीच्या अमेरिकन युनिट बायजूच्या अल्फाने दिवाळखोरी याचिका दाखल केली ​​आहे.

आत्ताच एक दिवस आधी बातमी आली होती की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे पगार मिळण्यास उशीर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्फाने दिवाळखोरी याचिका दाखल केल्याने बायजू यांना थोडा दिलासा मिळू शकतो.

Salaries delayed, US unit files for bankruptcy
IPO News: पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 600 कोटी रुपयांचा IPO येतोय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, 'काही गुंतवणूकदारांनी आमच्या अडचणी पाहिल्या आणि त्यांनी कट रचण्याची ही एक उत्तम संधी मानली आणि संस्थापकाला Byju's चे ग्रुप CEO म्हणून काढून टाकण्याची मागणी केली. हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटत आहे, असे ते म्हणाले.

Salaries delayed, US unit files for bankruptcy
Meta Dividend: फेसबुक पहिल्यांदाच देणार डिव्हिडंड, मार्क झुकरबर्गला मिळणार 5,800 कोटी रुपये

या निवडक गुंतवणूकदारांनी विनाकारण वाद निर्माण केल्यामुळे या महिन्याच्या पगाराच्या वितरणात थोडा उशीर होणार असल्याची माहिती Think and Learn Pvt ने कर्मचाऱ्यांना दिली. ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की, बायजूने गेल्या काही महिन्यांतील पगार देण्याची जबाबदारी स्वत: घेतली होती.

बायजूने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आपले घरही गहाण ठेवले होते. पगार टप्प्याटप्प्याने दिले जातील, असे आम्ही पुन्हा आश्वासन देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.