Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Increment in India: देशात पगारवाढीचा हंगाम सुरु झाला आहे. जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता कर्मचारी आपल्या वाढीव पगाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की, भारतीय कंपन्या यावर्षी 12 टक्क्यांपर्यंत पगार वाढ देण्यास तयार आहेत.
salary hike in indian companies is going to be in between 6 to 12 percent says a survey
salary hike in indian companies is going to be in between 6 to 12 percent says a survey Sakal
Updated on

Increment in India: देशात पगारवाढीचा हंगाम सुरु झाला आहे. जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता कर्मचारी आपल्या वाढीव पगाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की, भारतीय कंपन्या यावर्षी 12 टक्क्यांपर्यंत पगार वाढ देण्यास तयार आहेत. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवायचे आहे.

9 ते 12 टक्के पगारवाढ मिळू शकते

मिंट अँड शाइनने हे सर्वेक्षण केले आहे. यंदा कर्मचाऱ्यांना 9 ते 12 टक्के पगारवाढ मिळू शकते, अशी माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सुमारे 34 टक्के एचआर अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला मान्यता दिली आहे.

दुसरीकडे, सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांना 10 ते 15 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. सर्वेक्षणात सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांना 20 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा यंदा पूर्ण होताना दिसत नसल्याचे दिसून आले आहे.

salary hike in indian companies is going to be in between 6 to 12 percent says a survey
Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्याही सकारात्मक

या अहवालात सुमारे 3000 HR अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते घेण्यात आली. जानेवारी ते मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात सुमारे 49 टक्के भरती करणाऱ्यांनी मूल्यांकनाबाबत सकारात्मक मत दिले आहे. सुमारे 25 टक्के कंपन्यांमध्ये 6 ते 8 टक्के वाढ होऊ शकते. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्या सकारात्मक आहेत.

मंदी असूनही चांगल्या वाढीची अपेक्षा

चांगल्या वेतनवाढीचा हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा अनेक भारतीय कंपन्या नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच, जगभरातून कर्मचारी कपातीच्या बातम्या येत आहेत.

salary hike in indian companies is going to be in between 6 to 12 percent says a survey
Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

तंत्रज्ञानाचा वाढता वापर, जगात युद्धाचे वातावरण आणि इतर कारणांमुळे आयटी, स्टार्टअप आणि रिटेल उद्योगांमध्ये सुस्तीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कंपन्यांमध्ये सरासरी 9.7 टक्के पगारवाढ वाढ झाली होती. सर्वेक्षणात केवळ 2 टक्के कंपन्यांनी 0 ते 2 टक्के पगारवाढ देणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.