FTX Fraud: 'क्रिप्टो किंग' सॅम बँकमन फ्राइड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषी; 110 वर्षांची होऊ शकते शिक्षा

FTX Fraud: FTX ही जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टो एक्सचेंज फर्म होती.
Sam Bankman-Fried found guilty in FTX crypto fraud case
Sam Bankman-Fried found guilty in FTX crypto fraud case Sakal
Updated on

FTX Fraud: न्यायालयाने सॅम बँकमन फ्राइडला मनी लाँड्रिंगप्रकरणात दोषी ठरवले आहे. सॅम बँकमन हा क्रिप्टो एक्सचेंज फर्म FTX चे सह-संस्थापक आहे. एकेकाळी जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टो एक्सचेंज फर्म होती.

न्यूयॉर्कच्या ज्युरीने त्याला 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकदार आणि ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. बँकमन फ्राइडने दावा केला की त्याने कोणतीही फसवणूक केली नाही. मात्र ज्युरींनी हा दावा फेटाळून लावला. FTX ही वर्षभरापूर्वी दिवाळखोर झाली होती.

ज्युरीने सॅम बँकमन फ्राइडला चार तासांहून अधिक काळ विचारविनिमय केल्यानंतर फसवणूक आणि गुन्हेगारी कट या सात गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. महिनाभर चाललेल्या सुनावणीनंतर FTX ने दिवाळखोर जाहीर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर हा निर्णय आला आहे. या गुन्ह्यात बँकमनला 110 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

बँकमन-फ्राइडचे वकील मार्क कोहेन म्हणाले, “आम्ही ज्युरीच्या निर्णयाचा आदर करतो, परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही अत्यंत निराश झालो आहोत. मिस्टर बँकमन-फ्राइड यांनी त्यांचे संपूर्ण निर्दोषत्व कायम ठेवले आहे आणि ते त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी लढा देत राहतील.''

Sam Bankman-Fried found guilty in FTX crypto fraud case
Success Story: रस्त्यावरचा गुंड असा बनला अब्जाधीश

बँकमनवर गुंतवणूकदारांशी खोटे बोलून FTX मधून अब्जावधी डॉलर्स चोरल्याचा आणि त्याच्या कंपनीला मदत करण्यासाठी पैसे वापरल्याचा आरोप होता. बँकमनने त्याच्या ट्रेडिंग फर्म अल्मेडा रिसर्चद्वारे FTX ग्राहकांकडून पैसे घेतले आणि तो पैसा अल्मेडा रिसर्चच्या कर्जदारांना दिला. या पैशाचा वापर त्याने मालमत्ता खरेदी, विविध गुंतवणूक आणि राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीही केला.

Sam Bankman-Fried found guilty in FTX crypto fraud case
Jio Cinema: जिओ सिनेमा आणि डिस्ने हॉटस्टारमध्ये होणार डील? अंबानींकडे असणार देशातील सर्वात मोठे नेटवर्क

या प्रकरणात बँकमनचे तीन माजी सहकारी आणि मित्रही दोषी आढळले आहेत. बँकमनची माजी प्रेयसी कॅरोलिन एलिसन हिने स्वतःची शिक्षा कमी व्हावी म्हणून बँकमनविरुद्ध साक्ष दिली. आता लवकरच न्यायालय बँकमनला शिक्षा सुनावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.