Crypto Fraud: 'क्रिप्टो किंग' सॅम बँकमन-फ्राइडला कोर्टाने का सुनावली 25 वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

Sam Bankman-Fried Sentenced To 25 Years: अमेरिकेतील एफटीएक्सचे संस्थापक सॅम बँकमन फ्राइड यांना गुरुवारी न्यायाधीशांनी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. फ्राइडवर त्याची कंपनी FTX द्वारे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधील ग्राहकांकडून आठ अब्ज डॉलर्स चोरल्याचा आरोप आहे
Sam Bankman-Fried Sentenced To 25 Years
Sam Bankman-Fried Sentenced To 25 YearsSakal
Updated on

Sam Bankman-Fried Sentenced To 25 Years: अमेरिकेतील एफटीएक्सचे संस्थापक सॅम बँकमन फ्राइड यांना गुरुवारी न्यायाधीशांनी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. फ्राइडवर त्याची कंपनी FTX द्वारे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधील ग्राहकांकडून आठ अब्ज डॉलर्स चोरल्याचा आरोप आहे, जी कंपनी आता दिवाळखोर झाली आहे. सरकारी वकिलांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक फसवणूक म्हटले आहे.

32 वर्षांच्या बँकमन-फ्राइड, FTX मधील सहकाऱ्यांबद्दल म्हणाला की, "त्यांनी खरोखर सुंदर काहीतरी तयार केले आणि मी ते सर्व फेकून दिले. याचा मला दररोज त्रास होत आहे. हे सर्व घडताना पाहणे खूप अवघड आहे,". (Sam Bankman-Fried sentenced to 25 years in prison over FTX collapse)

बँकमन-फ्राइड यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही दु:खी आहोत आणि आमच्या मुलासाठी लढत राहू." जोसेफ बँकमन आणि बारबरा फ्राइड हे शिक्षेच्या सुनावणीवेळी न्यायालयात होते.

Sam Bankman-Fried Sentenced To 25 Years
PM Modi-Bill Gates: एआयपासून ते डिजिटल पेमेंट पर्यंत, बिल गेट्स आणि PM मोदी यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे

मॅनहॅटन यूएस ॲटर्नी डॅमियन विल्यम्स यांनी शिक्षा सुनावल्यानंतर एका निवेदनात म्हटले आहे की, "सॅम बँकमन-फ्राइडने इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक फसवणूक केली आणि त्याने ग्राहकांकडून 8 अब्ज डॉलर्सची चोरी केली आहे." (FTX founder Sam Bankman-Fried sentenced to 25 years in prison for multi-billion dollar fraud)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बँकमनवर गुंतवणूकदारांकडून खोटे बोलून FTX मधून अब्जावधी डॉलर्स चोरल्याचा आणि त्याच्या कंपनीला मदत करण्यासाठी पैसे वापरल्याचा आरोप होता. नोव्हेंबरमध्ये एका ज्युरीने बँकमन-फ्राइडला ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले होते.

Sam Bankman-Fried Sentenced To 25 Years
RBI Alert: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! 1 एप्रिलला 2,000च्या नोटा बदलता येणार नाहीत; काय आहे कारण?

त्याने एफटीएक्स गुंतवणूकदारांशी खोटे बोलल्याचेही आढळून आले. बँकमन-फ्राइड आणि त्याच्या वकिलांनी कबूल केले की त्याने चुका केल्या आहेत परंतु ते म्हणाले की, त्याचा कधीही कोणाची फसवणूक करण्याचा हेतू नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()