Samsung Strike: सॅमसंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा 55 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा संप; चिपचे उत्पादन धोक्यात

Samsung Worker's Strike: जगातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेली सॅमसंग कंपनी अडचणीचा सामना करत आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे हजारो कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत.
Samsung
Samsung Worker's StrikeSakal
Updated on

Samsung Worker's Strike: जगातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेली सॅमसंग कंपनी अडचणीचा सामना करत आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे हजारो कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. सॅमसंगच्या इतिहासातील कर्मचाऱ्यांचा हा सर्वात मोठा संप आहे.

55 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा संप

सॅमसंगचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वीच संपावर गेले आहेत. याआधी गेल्या महिन्यात सॅमसंगचे कर्मचारी एकदिवसीय संपावर गेले होते. मागण्या मान्य न झाल्याने प्रकरण पुढे सरकले असून आता ते पुन्हा संपावर गेले आहेत.

सॅमसंग कर्मचाऱ्यांचा हा संप 3 दिवसांचा आहे. सॅमसंगच्या 55 ​​वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा संप मानला जात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे सॅमसंगच्या सेमीकंडक्टर (चिप) उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

सॅमसंगच्या चिप उत्पादनावर परिणाम होणार

Hwaseong येथे असलेल्या सॅमसंगच्या सेमीकंडक्टर प्लांटच्या बाहेर 5 हजार लोकांना एकत्र करण्याचे युनियनचे ध्येय आहे. मात्र सॅमसंग कर्मचारी संघटनेच्या आवाहनावरून किती कर्मचारी नोकरी सोडणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, त्यानंतरही आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या संपाचा परिणाम सॅमसंगच्या चिप उत्पादनावर होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Samsung
Bhavish Aggarwal: ईस्ट इंडिया कंपनीसारखी लूट केली जात आहे; भाविश अग्रवाल यांचा विदेशी कंपन्यांवर हल्ला

'या' कारणांमुळे सॅमसंगचे कर्मचारी संपावर गेले आहेत?

सॅमसंगचे कर्मचारी पगार आणि रजेबाबत असमाधानी आहेत. कामगार संघटना नॅशनल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स युनियन, ज्यांचे 28 हजारांहून अधिक कर्मचारी सदस्य आहेत, वेतनश्रेणीबाबत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नसल्याने हे प्रकरण पुढे गेले असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी चिप युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चिप व्यवसायातील तोट्याचे कारण देत बोनस दिला गेला नाही. कंपनी आणि कर्मचाऱ्यांमधील वाद वाढवणारा हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

Samsung
ITR Filing: तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

कंपनीला यापूर्वी झाले होते मोठे नुकसान

अलीकडे, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे, विशेषत: त्यांच्या महत्त्वपूर्ण चिप उत्पादन विभागात. गेल्या वर्षी कंपनीने दशकभरातील सर्वात कमी नफा कमावला होता. तसेच, AI चिप्स सारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com