Samsung Strike: सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच; पोलिसांनी 900हून अधिक कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

Samsung Strike: सॅमसंगच्या चेन्नईतील प्लांटवर 9 सप्टेंबरपासून सुरू असलेला संप महिना उलटून गेल्यानंतरही संपलेला नाही. मंगळवारी पोलिसांनी 900 हून अधिक संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले.
Samsung Strike Chennai
Samsung Strike Chennai Sakal
Updated on

Samsung Strike: सॅमसंगच्या चेन्नईतील प्लांटवर 9 सप्टेंबरपासून सुरू असलेला संप महिना उलटून गेल्यानंतरही संपलेला नाही. मंगळवारी पोलिसांनी 900 हून अधिक संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले. यामुळे कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील परिस्थिती आणखीनच बिघडल्याचे दिसत होते. रस्त्यावर आंदोलन केल्याने या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांची सुटका झाल्याची माहितीही समोर आली.

गेल्या काही वर्षांतील हा देशातील सर्वात मोठा संप मानला जात आहे. या प्लांटमध्ये कंपनी रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि वॉशिंग मशिनसारखी उत्पादने बनवते. सणासुदीपूर्वी सुरू झालेल्या या संपामुळे कंपनीच्या महसुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सर्व प्रयत्न करूनही तोडगा निघताना दिसत नाही. आपले वेतन वाढवावे, कामाचे तास सुधारावेत, त्यांच्या युनियन ‘सिटू’ला कंपनीने मान्यता द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

Samsung Strike Chennai
Rahul Gandhi: अनंत अंबानीच्या लग्नावर राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, अंबानी कुटुंबाचा पैसा...

16 सप्टेंबर रोजी 104 जणांना ताब्यात घेण्यात आले

पोलिसांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी सॅमसंगच्या 912 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या संपात सुमारे एक हजार कर्मचारी सहभागी आहेत. सॅमसंगच्या या प्लांटमध्ये सुमारे 1800 कर्मचारी काम करतात. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी पोलिसांनी 104 जणांना ताब्यात घेतले होते.

सॅमसंगने या विषयावर सध्या काहीही सांगितलेले नाही. मात्र, या भागातील इतर कंपन्यांच्या तुलनेत आम्ही लोकांना जवळपास दुप्पट पगार देत आहोत, असे त्यांनी सांगितले होते. तसेच कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न ऐकून सोडविण्यास आम्ही तयार आहोत.

Samsung Strike Chennai
Microsoft Employee: चार तास काम अन् 2 कोटी पगार! कंपनीच्या 'ड्रीम जॉब'बाबत सोशल मीडियावर धुमाकूळ

याआधी संप थांबवण्यासाठी कंपनीने न्यायालयातही धाव घेतल्याची माहिती समोर आली होती. यासोबतच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या संपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया व्हिजनलाही मोठा फटका बसला आहे.

सध्या सॅमसंगसाठी ही दिलासादायक बाब आहे की त्यांच्या उत्तर प्रदेशात असलेल्या स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये काम चालू आहे. उत्पादनाला गती देण्यासाठी कंपनीने काही कंत्राटी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींचीही भरती केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.