Petrol Diesel Prices: रविवारी संध्याकाळी, OPEC+ या कच्च्या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने तेलाचे उत्पादन कमी करण्याची घोषणा केली आहे. OPEC+ ने सांगितले आहे की ते दररोज 1 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेलाचे उत्पादन कमी करेल.
डिसेंबर 2023 पर्यंत कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज 16.57 लाख बॅरलने कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व प्रमुख कच्चे तेल उत्पादक देश यासाठी तयार आहेत. (saudi arabia and opec plus announces oil output cuts supporting stability of oil market)
उत्पादनात कोण किती कपात करेल? (प्रति दिन)
रशिया: 5,00,000 बॅरल
सौदी अरेबिया: 500,000 बॅरल
इराक: 211,000 बॅरल
UAE: 1,44,000 बॅरल
कुवेत: 1,28,000 बॅरल
कझाकस्तान: 78,000 बॅरल
अल्जेरिया: 48,000 बॅरल
ओमान: 40,000 बॅरल
गॅबॉन: 8,000 बॅरल
एकूण: 16,57,000 बॅरल
उत्पादन कमी करण्याची घोषणा का करण्यात आली?
किंमती स्थिर ठेवण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक असल्याचा ओपेकचा दावा आहे. गेल्या तिमाहीत किंमती मोठ्या प्रमाणात सुधारल्या आहेत. भारत आणि चीन वगळता जागतिक मागणीत घट होत आहे.
भारतावर आणि संपूर्ण जगावर काय परिणाम होईल?
आरबीआयच्या पतधोरणापूर्वी तेलाच्या किंमतीत झालेली वाढ भारतासाठी नकारात्मक संकेत आहे. आगामी काळात महागाई आणखी वाढू शकते.
तसेच, व्याजदर वाढू शकतात. गोल्डमन सॅक्सच्या अहवालात असे नमूद केले आहे की 2023 साठी कच्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 90 डॉलर आहे.
कच्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. अशा स्थितीत कंपन्यांच्या नफ्यावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स पडू शकतात.
सौदी अरेबियाने या कपातीला सावधगिरीचे पाऊल म्हटले आहे :
सौदी अरेबियाच्या या पाऊलामुळे तेलाच्या किंमती वाढू शकतात, ज्यामुळे रियाध आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होऊ शकतो.
अगोदरच युक्रेन-रशिया युद्धामुळे संपूर्ण जगाला महागाईचा सामना करावा लागत आहे. काही ओपेक आणि बिगर ओपेक सदस्यांशी समन्वय साधून ही कपात केली जाईल, असे ऊर्जामंत्र्यांनी रविवारी सांगितले. मात्र, त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.