Investment Tips : रोज वाचवा ५० रुपये आणि निवृत्तीनंतर मिळवा ३ कोटी

जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि इयत्ता दहावीपासून गुंतवणूक करू इच्छित असाल, तर तुम्ही दररोज ५० रुपये वाचवू शकता.
Investment Tips
Investment Tips google
Updated on

मुंबई : आधुनिक काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय खुले झाले आहेत. तरुण वयातच गुंतवणुकीची सुरुवात केली तर पुढे काही अडचण येत नाही. बहुतेक लोक त्यांच्या गुंतवणुकीचा पर्याय मोठ्या वयात सुरू करतात, ज्यामुळे ते चांगली रक्कम जमा करण्याची संधी गमावतात.

लो एजमध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये कमावता येतात. जर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये रोज फक्त ५० रुपये गुंतवायला सुरुवात केली तर निवृत्तीच्या वयापर्यंत तुम्हाला करोडो रुपये मिळतील.

जर तुम्ही दहावी किंवा बारावीत असाल तर तुमच्यासाठी करोडो रुपये जमा करण्याची चांगली संधी आहे. (save rs 50 daily and get 3 crore after retirement )

Investment Tips
Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान घरातील ही कामे करणे टाळा

दहावीपासून एसआयपीद्वारे गुंतवणूक

जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि इयत्ता दहावीपासून गुंतवणूक करू इच्छित असाल, तर तुम्ही दररोज ५० रुपये वाचवू शकता. दररोज ५० रुपये म्हणजे दरमहा १५०० रुपये दरमहा तुमच्या खात्यात जमा होतील. ही रक्कम दरमहा म्युच्युअल फंडांसाठी चांगली असू शकते.

किती रक्कम जमा केली जाईल

गणनेनुसार, 45 वर्षे किंवा निवृत्तीचे वय 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला 1500 गुंतवल्यास, एखादी व्यक्ती 12% च्या वार्षिक परताव्यासह 3.32 कोटी रुपयांची मोठी रक्कम जमा करू शकते. जर हा परतावा 10% राहिला तर वयाच्या 60 व्या वर्षी तुमची ठेव रक्कम 1.5 कोटी रुपये होईल.

Investment Tips
AIIMS Job : एम्समध्ये नोकरीची मोठी संधी; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार

१२वी नंतर गुंतवणूक

जर तुम्ही १२वी नंतर एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. जर तुमचे वय 17 ते 19 वर्षांच्या दरम्यान असेल आणि प्रत्येक महिन्याची गुंतवणूक 1500 रुपये असेल, तर 40 वर्षे वयापर्यंत तुम्हाला 12% रिटर्नवर 1.78 कोटी रुपये मिळू शकतात.

त्याच वेळी, 10 टक्के वार्षिक रिटर्नवर, 60 वर्षे वयापर्यंत 95 लाख रुपये गोळा केले जाऊ शकतात. जर तुम्हाला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही PPF NSC सारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.