SBI Customers Alert: एसबीआयचा ग्राहकांना इशारा! चुकूनही 'या' लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर खाते...

तुमचेही SBI बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
SBI Customers Alert
SBI Customers AlertSakal
Updated on

State Bank Of India Customers Accounts: तुमचेही SBI बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अनेक SBI ग्राहकांना असे मेसेज आले आहेत की संशयास्पद व्यवहारांमुळे तुमचे खाते तात्पुरते लॉक केले जाईल. हा मेसेज स्कॅमरकडून पाठवला जात आहे.

तुम्हालाही असाच मेसेज आला असेल, तर तुम्ही त्याला उत्तर न देणे आणि त्याबद्दल तक्रार करणेही महत्त्वाचे आहे. सरकारी अधिकृत पीआयबी फॅक्ट चेकने एसबीआयच्या ग्राहकांना अशा मेसेजपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

येथे तक्रार करा:

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एसबीआयच्या ग्राहकांना एक मेसेज पाठवला जात आहे, ज्यामध्ये तुमचे खाते तात्पुरते लॉक केले जाईल.

पीआयबीने म्हटले आहे की अशा मेसेजला किंवा ईमेलला उत्तर देऊ नये आणि बँकेची माहिती शेअर करू नये. तुम्हाला असा कोणताही मेसेज आल्यास, report.phishing@sbi.co.in वर कळवा.

लिंकवर क्लिक केल्यानंतर काय होईल?

स्कॅमरने पाठवलेल्या या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे गायब होण्याचा धोका वाढेल. स्कॅमर तुमचा वैयक्तिक डेटा चोरून बँक खात्यातून पैसे काढू शकतो. अशा परिस्थितीत अशा अज्ञात लिंकवर क्लिक करू नये.

काय केले पाहिजे?

वैयक्तिक माहिती कधीही अशा ईमेल किंवा एसएमएस आणि व्हॉट्सअॅप मेसेजला शेअर करू नये. असा कोणताही संदेश आल्यास, report.phishing@sbi.co.in वर कळवा. तुम्ही 1930 क्रमांकावरही कॉल करू शकता.

SBI Customers Alert
Gold Silver Price: मोठी बातमी! सोन्याच्या भावात 450 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचा भाव

बँकेने काय माहिती दिली:

एसबीआयने म्हटले आहे की, ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती जसे की खाते क्रमांक, पासवर्ड आणि संवेदनशील माहिती टेक्स्ट मेसेजद्वारे कधीही देऊ नये.

असा कोणताही मेसेज आल्यास त्याची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही SBI शाखा किंवा ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकता. बँकेने म्हटले आहे की बँक कधीही कोणत्याही ग्राहकाची वैयक्तिक माहिती विचारत नाही.

SBI Customers Alert
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()