SBI Loan Interest : स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का! कर्जाच्या व्याजदरामध्ये झाली वाढ; जाणून घ्या सविस्तर

SBI hikes base rate : विशेष म्हणजे आजपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत.
SBI Loan Interest Rate
SBI Loan Interest RateeSakal
Updated on

SBI Hikes Loan Interest Rates : स्टेट बँक ऑफ इंडियाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. फंड-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) आणि बेस रेटची मार्जिनल कॉस्ट वाढवण्याचा हा निर्णय आहे. यामुळे एसबीआयच्या कर्जाच्या व्याजदरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 15 डिसेंबर 2023, म्हणजेच आजपासून नवे दर लागू होणार आहेत.

एखादी बँक कमीत कमी किती व्याजदराने कर्ज देऊ शकते हे MCLR दरावर अवलंबून असतं. यापूर्वी SBI चे बेस रेट हे 10.10 टक्के होते, जे आता 0.15 टक्क्यांनी वाढवून 10.25 टक्के झाले आहेत. यामुळे कंझ्युमर लोन हे 0.10 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

कसे वाढले व्याजदर?

MCLR-आधारित व्याजदर आता 8% ते 8.85% या दरम्यान असणार आहेत. ओव्हरनाईट MCLR रेट हे पूर्वीप्रमाणेच 8% असणार आहेत. एक ते तीन महिन्यांसाठीचे MCLR दर हे 8.15 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आले आहेत.

SBI Loan Interest Rate
SBI PC Jewellers: एसबीआयने पीसी ज्वेलर्सच्या दोन निवासी मालमत्ता घेतल्या ताब्यात; काय आहे कारण?

सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर हे 8.45 टक्क्यांवरुन 8.55 टक्के करण्यात आले आहेत. एका वर्षाच्या कालावधीसाठी असणारे MCLR दर हे 8.55% वरुन 8.65% करण्यात आले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणारे MCLR दर हे 8.65% वरुन 8.75% करण्यात आले आहेत. तर तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणारे MCLR दर हे 8.75 टक्क्यांवरुन 8.85 टक्के करण्यात आले आहेत.

साधारणपणे कंझ्युमर लोन हे एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीचे असतात. या सर्व कर्जांच्या व्याजदरामध्ये 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा मोठा फटका कर्जदारांना बसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()