SBI Bank Hikes MCLR: SBIचा कर्जधारकांना मोठा झटका! EMI मध्ये होणार 'इतक्या' टक्क्यांची वाढ

या निर्णयामुळे घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
SBI
SBI Sakal
Updated on

SBI Bank Hikes MCLR: देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने लाखो ग्राहकांची निराशा केली आहे. स्टेट बँकेने MCLR दर वाढवले ​​आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कारण SBI च्या या निर्णयामुळे आता EMI महाग होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी MCLR दरात 0.05% वाढ केली. त्यामुळे कर्जावरील व्याज महाग झाले. विशेष बाब म्हणजे हे नवीन दर 15 जुलै 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू होतील.

विशेष म्हणजे सर्व बँकांना MCLR जाहीर करणे बंधनकारक आहे. सर्व बँका एक महिना, 3 महिने, 4 महिने आणि 2 वर्षांसाठी MCLR घोषित करतात. MCLR मध्ये वाढ म्हणजे गृहकर्ज तसेच वाहन कर्जावरील व्याजदर वाढेल.

MCLR देखील 5 bps ने वाढून 8.65 टक्के झाला

एसबीआयच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे, ग्राहकांसाठी ईएमआयवरील व्याजदर आणखी वाढतील. ही वाढ फ्लोटिंग व्याजदरावर लागू आहे आणि निश्चित व्याजदरावर नाही.

तसेच, MCLR वाढल्यानंतर, EMI फक्त रीसेट तारखेलाच वाढेल. विशेष बाब म्हणजे 3 महिन्यांसाठी MCLR 5 bps ने वाढून 8.15 टक्के झाला आहे.

तर 6 महिन्यांचा MCLR वाढून 8.45 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, 2 वर्षांचा MCLR देखील 5 bps ने वाढून 8.65 टक्के झाला आहे. तर तीन वर्षांचा MCLR 8.75 टक्के झाला आहे.

SBI
Milk Price: राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर 34 रूपयांचा किमान भाव

MCLR म्हणजे काय?

Marginal Costs of Fund-Based Lending Rate म्हणजे MCLR हा रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर लागू केला. MCLR मुळे ग्राहकांना कर्ज घेणे सोपं झालं.

MCLR म्हणजे घेतलेल्या कर्जावरील किमान व्याज दर असतो. याआधी कर्जाच्या व्याजासाठी बेस रेट असायचा. मात्र, आरबीआयने 1 एप्रिल 2016 पासून MCLR लागू केला.

बँक आणि ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा, बँकेच्या व्याज दर ठरवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी MCLR लागू करण्यात आला. 

SBI
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.