Home Loan: महागाईत SBI देतेय स्वस्त गृहकर्ज, लाभ घेण्याची आज शेवटची संधी, काय आहे ऑफर?

Home Loan: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार प्रोसेसिंग फीमध्ये 50 ते 100 टक्के सूट दिली जात आहे.
Home Loan
Home LoanEsakal
Updated on

Home Loan: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे. ग्राहकांना कमी व्याजावर गृहकर्ज घेण्याची आजची शेवटची संधी आहे. तुम्हालाही SBI कडून गृहकर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही गृहकर्जाच्या व्याजात 55 bps पर्यंत सूट घेऊ शकता.

प्रक्रिया शुल्क आणि गृहकर्ज सवलतीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार प्रोसेसिंग फीमध्ये 50 ते 100 टक्के सूट दिली जात आहे.

ही सवलत रेग्युलर होम लोन, एनआरआय आणि नॉन सॅलरी होम लोनवर दिली जात आहे. याशिवाय जीएसटीमध्येही सूट मिळणार आहे.

Home Loan
Zomato Share Price: झोमॅटोने 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट, काय आहे तेजीचे कारण?

इन्स्टा होम टॉप अप, रिव्हर्स मॉर्टगेज आणि ईएमडीसाठी कोणतीही सूट नाही. यावर, कर्जाच्या रकमेच्या 0.35 टक्के प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. यावरही जीएसटी लागू होईल आणि तो किमान 2,000 रुपये अधिक जीएसटी आणि कमाल 10,000 रुपये अधिक जीएसटी असू शकतो.

Home Loan
Rice Exports: निर्यातबंदी असतानाही भारत 'या' देशात पाठवणार तांदूळ, मोदी सरकारने सांगितले कारण

गृहकर्ज व्याज सवलत

जर CIBIL स्कोअर 750-800 आणि त्यापेक्षा जास्त असेल तर सवलतीशिवाय व्याज 9.15 टक्के आहे आणि 45 bps डिस्काउंटनंतर व्याज दर 8.70 टक्के आहे. तर 650 - 699 च्या CIBIL स्कोअरवर 0.30 टक्के व्याज सवलत उपलब्ध आहे, त्यानंतर नवीन दर 9.15 टक्के होईल, तर 550 - 649 दरम्यान CIBIL स्कोअरवर कर्ज 9.65 टक्के होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.