Sbi Net Banking: SBIच्या लाखो ग्राहकांसाठी मोठी बातमी; आज बँकिंग सेवा 1 तास राहणार बंद

SBI YONO App Downtime: आज म्हणजेच 23 मार्चला चौथ्या शनिवारमुळे देशभरातील सर्व बँका बंद आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचाही समावेश आहे. सरकारी सुट्टीमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बंद असल्याने ग्राहकांना काही तासांसाठीच ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
Sbi Net Banking Mobile App Yono Will Remain Closed today Check Details Here
Sbi Net Banking Mobile App Yono Will Remain Closed today Check Details HereSakal
Updated on

SBI YONO App Downtime: आज म्हणजेच 23 मार्चला चौथ्या शनिवारमुळे देशभरातील सर्व बँका बंद आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचाही समावेश आहे. सरकारी सुट्टीमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बंद असल्याने ग्राहकांना काही तासांसाठीच ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

तर, बँकेच्या डिजिटल सुविधेवर एका तासासाठी बंदी असेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने आधीच कळवले आहे की ते 23 मार्च 2024 रोजी त्यांचे डिजिटल चॅनेल काही काळ बंद ठेवणार आहेत. (Sbi Net Banking Mobile App Yono Will Remain Closed today Check Details Here)

अशा परिस्थितीत, एसबीआयच्या ग्राहकांना काही सेवा वापरता येणार नाहीत. परंतु व्यवहारासाठी इतर पर्याय आहेत ज्याचा वापर करून ग्राहक पैसे काढू शकतात आणि एकमेकांना पाठवू शकतात. SBIच्या कोणत्या सेवा 24 तास उपलब्ध नसतील आणि कोणत्या डिजिटल चॅनेलचा वापर करून तुम्ही व्यवहार करू शकाल जाणून घेऊया.

Sbi Net Banking Mobile App Yono Will Remain Closed today Check Details Here
New Rules: 1 एप्रिलपासून बदलणार आयसीआयसीआय, येस बँक, एसबीआय आणि ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचे नियम

कोणत्या सेवा उपलब्ध असणार नाहीत?

  • एसबीआय इंटरनेट बँकिंग

  • योनो लाईट

  • योनो बिझनेस वेब

  • मोबाइल ॲप

  • योनो

  • UPI

SBI चे ग्राहक आज काही तासांसाठी म्हणजे 23 मार्च 2024 पर्यंत डिजिटल चॅनेल वापरू शकणार नाहीत. तुम्ही SBI ची इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web, Mobile App, YONO आणि UPI सेवा दुपारी 01:10 ते IST दुपारी 02:10 दरम्यान वापरू शकणार नाही.

Sbi Net Banking Mobile App Yono Will Remain Closed today Check Details Here
New Rule: सेबीचा मोठा निर्णय! शेअर्सच्या खरेदी विक्रीचा नवीन नियम पुढील आठवड्यापासून लागू

असे व्यवहार करा

SBI ग्राहकांना दुपारी 01:10 ते 02:10 दरम्यान कुठेही व्यवहार करायचा असेल तर ते UPI Lite आणि ATM ची सुविधा वापरू शकतात. UPI Lite द्वारे तुम्ही कमी मूल्याचे व्यवहार करू शकता.

UPI Lite ने व्यवहार कसा करावा?

UPI Lite द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, तुमच्या फोनवर ॲप उघडा. होम स्क्रीनवर दिसणारा PAY पर्याय निवडा. आता तुमच्या UPI Lite बॅलन्समधून पैसे ट्रान्सफर केले जातील. या प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला UPI पिनही टाकावा लागणार नाही. UPI पिन शिवाय पैसे ट्रान्सफर केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.