Infosys: देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने इन्फोसिसला टाकले मागे; बनली देशातील पाचवी सर्वात मोठी कंपनी

SBI overtakes Infosys: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही बाजारमूल्याच्या बाबतीत आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसला मागे टाकले आहे. एसबीआय बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील 5वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
SBI overtakes Infosys to become India's fifth most valued firm
SBI overtakes Infosys to become India's fifth most valued firm Sakal
Updated on

SBI Becomes 5th Most Valuable Firm: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही बाजारमूल्याच्या बाबतीत आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसला मागे टाकले आहे. एसबीआय बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील 5वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

एसबीआयच्या शेअर्सने शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, SBI च्या शेअरची किंमत प्रति शेअर 777.50 रुपयांवर पोहोचली आणि या वाढीच्या आधारावर, SBI ने आपल्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. (SBI beats Infosys to become the fifth largest firm by market capitalisation)

एसबीआयच्या गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली बातमी आहे कारण शेअर सातत्याने विक्रमी उच्चांक गाठत आहे आणि बुधवारी त्याच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. हा शेअर PSU बँकांच्या वाढीचे नेतृत्व करत आहे.

SBI overtakes Infosys to become India's fifth most valued firm
Air India: आता विमानाने करा स्वस्तात प्रवास; एअर इंडिया एक्स्प्रेसची खास ऑफर, पण ही आहे अट

SBI चे मार्केट कॅप किती आहे? (What is the market cap of SBI)

बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप 6,88,578.43 कोटी रुपयांवर आले तर इन्फोसिसचे एमकॅप 6,87,349.95 कोटी रुपये होते. म्हणजेच SBI चे मार्केट कॅप इन्फोसिसच्या तुलनेत रु. 1228.48 कोटी रुपयांनी अधिक झाले आणि ती 5वी सर्वात मोठी कंपनी बनली.

जाणून घ्या देशातील टॉप 10 कंपन्या कोणत्या? (Which are the top 10 companies in India)

देशातील टॉप 10 मूल्यांकन कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी या कंपन्यांचा समावेश आहे.

SBI overtakes Infosys to become India's fifth most valued firm
Byju's Crisis: बायजू रवींद्रन यांच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्याचे ईडीचे निर्देश; काय आहे प्रकरण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.