SBI Hiring: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आर्थिक वर्ष 2025 मध्ये 15,000 हून अधिक लोकांची भरती करण्याच्या योजनेवर काम करत आहे. नवीन कर्मचाऱ्यांना ऑपरेशनल असिस्टंट- स्टेट बँक ऑपरेशन्स सपोर्ट सर्व्हिसेस म्हणून नियुक्त केले जाईल. शाखांचा विस्तार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी आणि मार्केटिंग टीमची क्षमता वाढवण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
SBI चालू आर्थिक वर्षात 3,000 हून अधिक नवीन शाखा उघडण्याचा विचार करत आहे. FY24 मध्ये बँकेने 139 नवीन शाखा उघडल्या होत्या.
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, गरजेनुसार नवीन भरती करण्यात येणार आहे. SBI आधीच चालू आर्थिक वर्षात विविध श्रेणींमध्ये 11,000-12,000 प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणजेच SBI PO नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत आहे.
खारा यांच्या म्हणण्यानुसार, 85 टक्क्यांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे अभियांत्रिकी पदवी आहे. नवोदितांना प्रथम बँकेच्या कामकाजाची ओळख करून दिली जाईल आणि नंतर त्यांना विविध पदांवर रुजू केले जाईल.
शाखांच्या संख्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर खारा म्हणाले, शाखांची संख्या कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. भारतासारख्या देशात ज्या प्रकारची आर्थिक प्रगती दिसत आहे, ती पाहता अनेक शक्यता आहेत. आम्हाला त्या विभागांवर लक्ष केंद्रित करावे लागेल त्यामुळे आम्हाला शाखांची संख्या वाढवायची आहे. मार्च 2023 अखेर SBI च्या एकूण 22,542 शाखा होत्या.
बँकेने 8000 लोकांना नियुक्त केले. ही नियुक्ती साधारणपणे निमशहरी शाखांमध्ये होते. याशिवाय शहरी आणि महानगरांमध्ये अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची बँकेची योजना असून त्याची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. खारा म्हणाले की, अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे.
एसबीआय समूहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बँकेत काम करणाऱ्या लोकांना बँक कार्यालयातील काम, मार्केटिंग आणि वसुली या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यंदा शहरी आणि महानगरांमध्ये बँकेची व्याप्ती वाढवण्याची योजना आहे.
यात नियुक्त केलेले बहुतांश कर्मचारी हे स्थानिक रहिवासी असणार आहेत. या स्थानिक लोकांमुळे बँकेची ग्राहकांपर्यंत पोहोच वाढली असून या कर्मचाऱ्यांचा प्रवास खर्चही कमी झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.