SEBI Action On Mehul Choksi: शेअर बाजार नियामक सेबीने फरार मेहुल चोक्सीविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने मेहुल चोक्सीची बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंडाची खाती जप्त करण्याचे आदेश जारी केला आहे.
शेअर बाजार नियामकांनी चोक्सीवर ऑक्टोबर 2022 मध्ये दंड ठोठावला होता. जो त्याने अजून भरलेला नाही. यामुळे सेबीने त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सेबीला मेहुल चोक्सीकडून 5.35 कोटी रुपये वसूल करायचे होते. फरार मेहुल चोक्सीने अद्याप ही रक्कम भरलेली नाही. त्यामुळे सेबीने त्याची बँक खाती आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंड खाती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या ट्रेडिंगशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात SEBI ने ऑक्टोबर 2022 मध्ये चोक्सीवर हा दंड ठोठावला होता.
सेबीने बुधवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये 5 कोटी रुपयांचा दंड, 35 लाख रुपयांचे व्याज आणि 1,000 रुपयांच्या वसुली खर्चाचा समावेश आहे.
आदेशापूर्वी, सेबीने चोक्सीला 18 मे रोजी नोटीस पाठवून 5.35 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर सेबीने चेतावणी दिली की 15 दिवसांच्या आत पैसे न भरल्यास अटक केली जाईल आणि बँकेची मालमत्ता जप्त केली जाईल.
पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी आणि नीरव मोदी 2018 च्या सुरुवातीला भारतातून पळून गेले. चोक्सी अँटिग्वा आणि बरबुडा येथे असल्याचे सांगितले जात आहे, तर नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात आहे आणि त्याने भारताच्या प्रत्यार्पण याचिकेला आव्हान दिले आहे.
मेहुल चोक्सी हा आंतरराष्ट्रीय हिरे व्यापारी आहे. त्याचा हिऱ्यांचा व्यवसाय इटली, चीन, जपान, हाँगकाँग, थायलंड, अमेरिकन आदी देशांमध्ये पसरलेला आहे. मेहुल चोक्सी हा गीतांजली जेम्सचा मालक आहे.
मेहुलने त्याच्या गीतांजली जेम्स ब्रँडमधून 70 हून अधिक ब्रँड विकसित केले. भारताशिवाय जगातील अनेक देशांमध्ये या ब्रँडची दुकाने होती.
मेहुल चोक्सीने त्याचा पुतण्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदीसह पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) 13,000 कोटी रुपयांची फसवणूक केली. या दोघांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि स्विफ्ट मेसेजिंग सिस्टमचा गैरवापर करून पीएनबी घोटाळा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.