Anil Ambani to pay Rs 25 crore fine as Sebi bans him from securities market: अनिल अंबानींच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अदानी समूहासोबत झालेल्या डीलच्या वृत्तानंतर त्यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. मात्र आता ते अडचणीत सापडले आहेत. बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांना रोखे बाजारातून पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
सेबीने त्यांच्यावर 25 कोटींचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह 24 जणांवरही बंदी घालण्यात आली आहे. कंपनीचा निधी वळवल्याच्या आरोपावरून या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली आहे.