SEBI Short Selling Rules: शेअर बाजारातील चढउतार टाळण्यासाठी बाजार सेबीने शॉर्ट सेलिंगचे नियम बदलले आहेत. आता संस्थात्मक गुंतवणूकदारांना ऑर्डर देताना हे जाहीर करावे लागेल की प्रस्तावित व्यवहार 'शॉर्ट सेलिंग' आहे की नाही.
याशिवाय किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्सची ‘शॉर्ट सेलिंग’ करण्याची परवानगी आहे. पण आता किरकोळ गुंतवणूकदारांना व्यवहाराच्या दिवशी ट्रेडिंग कालावधी संपेपर्यंत विक्रीची माहिती द्यावी लागेल.
काय बदल झाले?
सेबीने शुक्रवारी सांगितले की, संस्थात्मक गुंतवणूकदारांना ऑर्डर देताना सांगावे लागेल की प्रस्तावित व्यवहार 'शॉर्ट सेलिंग' आहे की नाही. शॉर्ट सेलिंग म्हणजे डीलच्या वेळी विक्रेत्याच्या मालकीचे नसलेले शेअर्स विकणे.
गेल्या काही महिन्यांत, शेअर बाजारात शॉर्ट सेलिंगचा वाढता कल आणि त्यानंतर होणार्या चढउतारांबाबत चिंता निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने बाजारात शॉर्ट सेलिंगशी संबंधित नियमांबाबत काही बदल केले आहेत.
"संस्थात्मक गुंतवणूकदारांना ऑर्डर देताना आगाऊ माहिती द्यावी लागेल की हा व्यवहार लहान विक्री आहे की नाही," असे सेबीने गेल्या वर्षी जारी केलेल्या शॉर्ट सेलिंगच्या परिपत्रकात सुधारणा करताना शुक्रवारी सांगितले.
सेबीने स्टॉक एक्सचेंजेस, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आणि डिपॉझिटरीज यांना जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की एक्सचेंजेस अशी माहिती गोळा करतील आणि सार्वजनिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करतील.
शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?
शॉर्ट सेलिंग ही ट्रेडिंग स्ट्रेटेजी आहे. बाजारात असलेला ट्रेडर शेअर जास्त किंमतीला विक्री करतो. नंतर किंमत घसरल्यावर तो शेअर खरेदी करतो.
या दरम्यान त्याला मोठा फायदा होतो. या स्ट्रेटेजीला शॉर्ट सेलिंग म्हणतात. या ट्रेडिंगमध्ये, ट्रेडर त्याच्याकडे शेअर नसताना पण त्याची विक्री करतो. नंतर किंमती घसरल्या की शेअर खरेदी करतो.
शॉर्ट सेलिंग कशी केली जाते?
बाजारात शॉर्ट सेलिंगचे तीन प्रकार आहेत. पहिला कॅश, दुसरा ऑप्शन आणि तिसरा प्रकार फ्युचर्स आहे. कॅशमध्ये केवळ इंट्रडे शॉर्ट सेलिंग करण्यात येते. तर ऑप्शन आणि फ्युचर्समध्ये शॉर्ट कॅरी फॉरवर्ड करता येतात. शॉर्ट सेलिंगवर सेबीची बारीक नजर असते.
शॉर्ट सेलिंगचे फायदे काय आहेत?
शॉर्ट सेलिंगचा सर्वाधिक फायदा म्हणजे अल्पावधीत त्यांना मोठा नफा मिळतो. शॉर्ट सेलिंगचा सर्वात मोठा तोटा म्हणजे, शॉर्ट सेलिंगच्या सहायाने ग्रुप तयार करुन एखाद्या विशेष कंपनीचा शेअर टार्गेट करण्यात येतो. त्या शेअरची किंमत ठरवून कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग झाल्यावर बाजार अस्थिर होण्याची भीती असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.