SEBI: सेबीच्या अध्यक्षांची धक्कादायक माहिती, देशात 35% गुंतवणूक सल्लागार...

SEBI: सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात ही माहिती दिली
SEBI Chairperson Madhabi Puri Buch says 35 percent e investment adviser is unregistered in India
SEBI Chairperson Madhabi Puri Buch says 35 percent e investment adviser is unregistered in India Sakal
Updated on

Investment Advisers: सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी सांगितले की, बाजारातील प्रत्येक विभागाचे नियमन वेगळ्या पद्धतीने केले पाहिजे. त्यांनी सांगितले की सेबी अशा नियमांचा मसुदा तयार करण्याचा विचार करत आहे. माधवी पुरी बुच म्हणाल्या की, सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे बहुतांश गुंतवणूक सल्लागार नोंदणीकृत नाहीत. गुंतवणूक सल्लागारांना नोंदणीसाठी मदत हवी आहे जेणेकरून ते नोंदणी करतील.

'जोखीम कमी करण्याची गरज'

मुंबईतील असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सच्या परिषदेत सेबीच्या अध्यक्षा म्हणाल्या की, बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करणे आवश्यक आहे.

माधवी पुरी म्हणाल्या की, नोंदणी प्रक्रिया सुलभ असूनही, 35% गुंतवणूक सल्लागार अद्याप नोंदणीकृत नाहीत. ते म्हणाल्या की असोसिएशनने सक्रिय असले पाहिजे आणि काही चूक झाल्यास सेबीकडे मदत मागितली पाहिजे.

SEBI Chairperson Madhabi Puri Buch says 35 percent e investment adviser is unregistered in India
LPG Cylinder Subsidy: दसरा-दिवाळी होणार गोड! गॅस सिलिंडर मिळणार स्वस्त, मोदी सरकारने इतक्या रुपयांनी वाढवली सबसिडी

गुंतवणूक सल्लागार (RIAs) आर्थिक नियोजनाच्या नियमांमध्ये काही शिथिलता आणण्याची मागणी करत आहेत. बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी सांगितले की, नियमनात गुंतवणूकदारांशी संबंधित सर्व संस्थांचा सहभाग असावा. आम्ही संस्थांना विनंती करतो की त्यांनी नेहमी केवळ आकडेवारीसह त्यांचे मत मांडावे.

SEBI Chairperson Madhabi Puri Buch says 35 percent e investment adviser is unregistered in India
Loan On Mutual Funds: कर्ज घ्या पण स्मार्टरीत्या! म्युच्युअल फंडवरही मिळते कर्ज, असे आहेत फायदे

सेबीच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताला किमान 10 लाख गुंतवणूक सल्लागारांची गरज आहे. गुंतवणूक सल्लागारांची मार्केट रेग्युलेटरकडे नोंदणी करावी लागेल यावर त्यांनी भर दिला. याव्यतिरिक्त, या सल्लागारांनी केवळ गुंतवणूक सल्ला द्यावा आणि ट्रेडिंग कॉल देऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.