SEBI T+0 System: शेअर खरेदी आणि विक्रीसाठी T+0 सेटलमेंट अनिवार्य करण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही, असे सेबीने म्हटले आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी या प्रकरणी सेबीची भूमिका मांडताना सांगितले की, सेबी बोर्डाने निवडक स्टॉक ब्रोकर्स ही सुविधा स्विकारतात का याची तपासणी करत आहे.
T+0 सेटलमेंट म्हणजे तुमचे शेअर्स खरेदी किंवा विक्रीची संपूर्ण प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होते. तुम्ही ज्या दिवशी शेअर्स खरेदी करता त्याच दिवशी ते तुमच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. त्याचप्रमाणे, तुम्ही शेअर्सची विक्री केली तर त्याच दिवशी तुम्हाला पेमेंट मिळेल.
Application Supported By Blocked Amount (ASBA) ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे किरकोळ गुंतवणूकदार IPO किंवा FPO मध्ये गुंतवणुकीसाठी अर्ज करतात आणि शेअर्सचे वाटप होईपर्यंत संबंधित रक्कम त्यांच्या बचत खात्यात ब्लॉक करतात.
तुम्हाला शेअर्सचे वाटप केले असल्यास ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाते अन्यथा वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती अनब्लॉक केली जाते.
प्राथमिक बाजारात ASBA अधिक लोकप्रिय आहे. यामध्ये IPO अर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात ब्लॉक केली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला सेबीने बाजारात व्यापारासाठी अशी सुविधा सुरू केली होती.
सध्या, ASBA बाजारपेठेतील ASBA ब्रोकरसाठी ऐच्छिक सुविधा आहे. SEBI ने आता असे म्हटले आहे की ASBA सेटलमेंट प्रणाली बाजारासाठी ऐच्छिक आधारावर सुरू करून काही काळ झाला आहे आणि ती चांगली काम करत आहे. सेबीने सांगितले की निवडक ब्रोकरेजसाठी ही सुविधा अनिवार्य करण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.