New Sebi Rules: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, आता 1 एप्रिल 2024 पासून सेबीचे नवे नियम होणार लागू

New Sebi Rules: सेबीने जून 2011 मध्ये SCORES प्लॅटफॉर्मची सुरुवात केले होती.
Sebi extends deadline for implementation of new norms of SCORES till April 2024
Sebi extends deadline for implementation of new norms of SCORES till April 2024 Sakal
Updated on

New Sebi Rules: बाजार नियामक सेबीने शुक्रवारी नोंदणीकृत कंपन्यांसाठी SCORE प्लॅटफॉर्मद्वारे तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तयार केलेल्या फ्रेमवर्कची अंमलबजावणीची मुदत 1 एप्रिल 2024 पर्यंत वाढवली आहे.

सेबीने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, "तरतुदींच्या अंमलबजावणीची तारीख 1 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

सप्टेंबरमध्ये, सेबीने नोंदणीकृत संस्थांसाठी SCORE प्लॅटफॉर्मद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी हाताळण्याबाबत आणि नियुक्त संस्थांद्वारे अशा तक्रारींचे निरीक्षण करण्याबाबत एक परिपत्रक जारी केले होते. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, SCORES द्वारे गुंतवणूकदारांच्या तक्रारी प्राप्त करणार्‍या कंपन्यांसह सर्व संस्थांना अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत सोडवाव्या लागतील.

स्कोअर काय आहे?

SCORES ही तक्रार निवारण प्रणाली आहे. जी जून 2011 मध्ये सुरू करण्यात आली होती. सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित कंपन्या, मध्यस्थ आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांविरुद्ध गुंतवणूकदार त्यांच्या तक्रारी सेबीकडे ऑनलाइन नोंदवू शकतात.

Sebi extends deadline for implementation of new norms of SCORES till April 2024
Tata Group: टाटांची 'ही' कंपनी होणार बंद! NCLT ने विलीनीकरणाच्या प्रस्तावाला दिली मंजूरी

जर एखाद्या गुंतवणूकदाराला स्कोर्स प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवायची असेल, तर त्याला प्रथम या प्लॅटफॉर्मवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या 'इन्व्हेस्टर कॉर्नर' अंतर्गत 'रजिस्टर हेअर'' वर क्लिक करू शकता.

तुम्हाला हे स्कोअरच्या होम पेजवर दिसेल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला या साइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तक्रार नोंदणीकडे जावे लागेल. आता तुम्हाला तुमच्या तक्रारीचा तपशील द्यावा लागेल. तक्रारीचा तपशील 1000 शब्दांपेक्षा जास्त नसावा.

Sebi extends deadline for implementation of new norms of SCORES till April 2024
UPI Transactions: UPI पेमेंटचा नवीन रेकॉर्ड! नोव्हेंबरमध्ये झाले 17.40 लाख कोटी रुपयांचे व्यवहार

सुविधा 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. ते तुमच्या ईमेलवर देखील पाठवले जाईल. हे तुम्हाला तुमच्या तक्रारीशी संबंधित कोणतीही माहिती मिळविण्यात मदत करेल. सेबीने टोल फ्री हेल्पलाइन सेवा क्रमांकही दिले आहेत.

तुम्ही 18002667575 किंवा 1800227575 वर मदत मिळवू शकता. या क्रमांकावर 8 भाषांमध्ये मदत मिळू शकते. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, बंगाली, तेलगू आणि कन्नड यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.