SEBI: म्युच्युअल फंड, डी-मॅट नामांकनाला मुदतवाढ; काय आहे नवीन तारीख?

SEBI: म्युच्युअल फंड योजना आणि डी-मॅट खात्यांसाठी नामांकन करण्याची अंतिम मुदत आता ३० जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार होती. भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने आज एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
SEBI extends Dec 31 deadline for mutual fund and demat account nomination
SEBI extends Dec 31 deadline for mutual fund and demat account nominationSakal
Updated on

मुंबई, ता. २७ ः म्युच्युअल फंड योजना आणि डी-मॅट खात्यांसाठी नामांकन करण्याची अंतिम मुदत आता ३० जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार होती.

भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने आज एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे अद्याप हे काम न केलेल्या असंख्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. आता ३० जूनपर्यंत गुंतवणूकदारांनी नामांकन करणे किंवा ते करायचे नसल्यास तशी माहिती देणे अनिवार्य आहे.

अनेक गुंतवणूकदार वेळेत ही प्रक्रिया करू न शकल्याचे कंपन्यांनी सांगितले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी, डी-मॅट खाती आणि म्युच्युअल फंड फोलिओसाठी नामांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ‘सेबी’ने म्हटले आहे.

SEBI extends Dec 31 deadline for mutual fund and demat account nomination
Zomato GST Notice: जीएसटीने झोमॅटोला पाठवली 400 कोटींची नोटीस; काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत जवळ आल्यावर, ‘सेबी’ने ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. गुंतवणूकदार नामांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांना फंड खाते किंवा डी-मॅट खात्यांमधून पैसे काढणे शक्य होत नाही.

SEBI extends Dec 31 deadline for mutual fund and demat account nomination
Ratan Tata Resume: रतन टाटा यांनी स्वतःच्याच कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तयार केला होता बायोडाटा

मुदतवाढीमुळे ही समस्या दूर झाली आहे. रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या आकडेवारीनुसार, सुमारे २५ लाख पॅन धारकांनी सप्टेंबर २०२३ पर्यंत त्यांच्या म्युच्युअल फंड फोलिओमध्ये नामांकन केले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.