Madhabi Puri Buch gets Clean Chit: सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या संसदेच्या अधिवेशनात त्यांचे नाव चर्चेत आले होते. काँग्रेसने त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर आणि भाजपवर आरोप केले होते. आरोप करताना म्हटले होते की, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे.
सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच या आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, आता तपास पूर्ण झाला असून त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.