SEBI SIP : आता 250 रुपयांपासून सुरू करता येणार 'एसआयपी'? सेबीने मांडला प्रस्ताव

ही मर्यादा आणखी कमी केल्यामुळे अधिकाधिक लोकांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा लाभ घेता येईल.
SEBI SIP 250
SEBI SIP 250eSakal
Updated on

म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीसाठी सिस्टिमेटिक प्लॅन अर्थात 'एसआयपी'द्वारे किमान २५० रुपये गुंतविण्याची सुविधा देण्याचा विचार भांडवल बाजार नियामक 'सेबी' करत आहे. सध्या किमान मर्यादा ५०० रुपये आहे. 'सेबी'च्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी नुकतीच येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

बूच म्हणाल्या, "म्युच्युअल फंडात 'एसआयपी'द्वारे दरमहा केवळ २५० रुपयांची गुंतवणूक व्यवहार्य ठरणार नाही, असे म्युच्युअल फंड उद्योगाचे मत आहे. मात्र, या उद्योगासाठीही २५० रुपयांची गुंतवणूक फायदेशीर ठरावी, असा मार्ग काढण्याचा 'सेबी' प्रयत्न करत आहे."

"एसआयपीची किमान मर्यादा कमी केल्यामुळे गुंतवणुकीवर होणारा खर्च वाढण्याची शक्यता आहे, तो कमी करण्यासाठी 'सेबी' प्रयत्न करत आहे. 'हिंदुस्थान लिव्हर'ने शॅम्पूचे सँशे आणले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही योजना कंपनीला लाभदायी ठरली, त्याप्रमाणे 'एसआयपी'चा हा सॅशे म्युच्युअल फंड क्षेत्रासाठीही फायदेशीर ठरेल, अशी आमची अपेक्षा आहे." असंही त्या म्हणाल्या.

SEBI SIP 250
Mutual Fund SIP: तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही SIP थांबवू शकता का? असा होऊ शकतो परिणाम

ही मर्यादा आणखी कमी केल्यामुळे अधिकाधिक लोकांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा लाभ घेता येईल. यामुळे आर्थिक समावेशनालाही चालना मिळेल आणि भांडवली बाजारालाही मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात सुधारणा आणि उपक्रमांचे संस्थात्मकीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे त्या दीर्घकाळ टिकून राहतील, असेही यावेळी बूच यांनी नमूद केले.

'एसआयपी' द्वारे उच्चांकी गुंतवणूक

म्युच्युअल फंड उद्योगात नोव्हेंबर महिन्यात 'एसआयपी'द्वारे १७ हजार कोटी रुपयांहून अधिक सर्वोच्च मासिक गुंतवणूक झाली आहे, तर इक्विटी योजनांमध्ये १५,५३६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अशावेळी 'सेबी'ची ही घोषणा लक्षवेधी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.