Adani-Hindenburg case: अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा वेळ मागितली आहे. बाजार नियामकाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, या प्रकरणावर पुरेसे काम झाले असून 15 दिवसांनी अहवाल सादर केला जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑगस्टपर्यंत सेबीला वेळ दिला होता आणि सुनावणीची तारीख 29 ऑगस्ट निश्चित केली होती. याचा अर्थ सेबी 29 ऑगस्ट रोजीच या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करेल.
यापूर्वी डेलॉइटने अदानी सेझच्या लेखापरीक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सोमवारी अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
डेलॉईटचा राजीनामा
डेलॉइटने अदानी सेझच्या लेखापरीक्षकपदाचा राजीनामा सादर केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी, डेलॉइटने अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांची स्वतंत्र बाहेरून चौकशी करण्याची मागणी केली होती.
कंपनीने म्हटले आहे की या आरोपांचा तिच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि डेलॉईटच्या राजीनाम्याचे कारण समाधानकारक नाही.
अदानी पोर्ट्स अँड इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने स्टॉक मार्केटला पाठवलेल्या 163 पानांच्या अहवालात Deloitte Haskins & Sells LLP चा राजीनामा पाठवला आहे.
अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले
सोमवारी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 4.50 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहे. दुसरीकडे, अदानी पोर्ट आणि SEZ च्या स्टॉकमध्ये 2.75 टक्क्यांची घसरण होत आहे.
अदानी पॉवर, अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मारचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक आणि अदानी ट्रान्समिशन 3.50 टक्क्यांनी घसरले आहेत.
सिमेंट कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर एसीसीच्या शेअरमध्ये 2 टक्के आणि अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये 3.50 टक्के घसरण झाली आहे. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये दीड टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.