SEBI: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी सेबी प्रमुखांचा सावधानतेचा इशारा! म्हणाल्या, गुंतवणुकीपूर्वी...

SEBI: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) म्हणणे आहे की, जास्त सबस्क्रिप्शन दाखवण्यासाठी आयपीओ अर्जांमध्ये हेराफेरीची प्रकरणे तपासली जात आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, सेबी अशा तीन प्रकरणांची चौकशी करत आहे.
Sebi to act against 3 investment bankers found inflating IPO subscriptions
Sebi to act against 3 investment bankers found inflating IPO subscriptions Sakal
Updated on

SEBI: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) म्हणणे आहे की, जास्त सबस्क्रिप्शन दाखवण्यासाठी आयपीओ अर्जांमध्ये हेराफेरीची प्रकरणे तपासली जात आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, सेबी अशा तीन प्रकरणांची चौकशी करत आहे. मात्र, तपासाचे स्वरूप त्यांनी सांगितले नाही.

त्या म्हणाल्या की, गैरप्रकारांमध्ये काही मर्चंट बँकर्सची नावेही समोर आली आहेत. एआयबीआय 2023-24 च्या वार्षिक परिषदेमध्ये बुच यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही महिन्यांत डझनभर कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या आणि बहुतेक आयपीओंना अनेक पट सबस्क्रिप्शन मिळाले. एआयबीआय अर्थात असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच म्हणाल्या की, आयपीओ बरेच व्यापारी खरेदी करत आहेत पण यात गुंतवणूकदार नाहीत.

Sebi to act against 3 investment bankers found inflating IPO subscriptions
RBI Action: आरबीआयचा सहकारी बँकांना दणका; 50 लाखांहून अधिकचा ठोठावला दंड

जास्त सबस्क्रिप्शन दाखवण्यासाठी बनावट खाती वापरली जात आहेत. सेबीला याबाबतचे संकेत मिळाले आहेत. हे थांबवण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील.

किरकोळ गुंतवणूकदारांनी लिस्ट केल्यानंतर गुंतवणूक करावी

रिटेल गुंतवणूकदारांनी आयपीओनंतर दुय्यम बाजारात गुंतवणूक करावी, असे सेबीच्या प्रमुख म्हणाल्या. IPO मध्ये मोठ्या संख्येने लोक विक्री करतात आणि IPO लिस्ट झाल्यानंतर लगेच निघून जातात. आकडेवारीनुसार, 43% किरकोळ गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करतात आणि लिस्ट झाल्यानंतर 1 आठवड्याच्या आत बाहेर पडतात.

Sebi to act against 3 investment bankers found inflating IPO subscriptions
Ram Mandir Ayodhya: अयोध्येला जाण्यासाठी मोफत बस सेवा; कसे मिळवायचे तिकीट जाणून घ्या

68% HNIs म्हणजेच उच्च नेट वर्थ व्यक्ती IPO लिस्टच्या 1 आठवड्याच्या आत शेअर्स विकून बाहेर पडतात. माधबी पुरी बुच म्हणाल्या की, आयपीओ बाजारातील तेजीचे श्रेय पूर्ण इकोसिस्टमचे आहे. आयपीओच्या मंजुरीसाठी लागणारा कालावधी कालांतराने कमी झाला आहे.

बहुतांश व्यापारी आयपीओमध्ये पैसे गुंतवत आहेत

सेबी प्रमुख म्हणाल्या की, जर एखाद्या गुंतवणूकदाराला नुकत्याच लिस्ट झालेल्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर त्याने किमान एक तिमाहीच्या निकालाची प्रतीक्षा करावी. जर कोणी व्यापारी असेल तर त्याच्यासाठी IPO मध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे कारण अस्थिरता हा बाजाराचा भाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.