SEBI's chatbot SEVA: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI ने सोमवारी गुंतवणूकदारांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चॅटबॉट प्लॅटफॉर्म 'SEVA' लॉन्च केला आहे. हा चॅटबॉट नुकताच बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आला असून गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेचा विचार करून तो पूर्णपणे तयार करण्यात आला आहे.
तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर हा चॅटबॉट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आता तुम्हाला एका क्षणात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोणतीही फसवणूक झाल्यास तक्रार कशी करता येईल आणि ती सोडवण्याची प्रक्रिया कशी आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे चॅटबॉट चांगले काम करत आहे.
SEVA चॅटबॉटसाठी लिंक: https://shorturl.at/3xEty
SEVA चॅटबॉट SEBIच्या वेबसाइटवर वापरला जाऊ शकतो. तुम्ही ते Android आणि iOS वर SAARTHI मोबाइल ॲपमध्ये देखील वापरू शकता. सेबीने निवेदनात म्हटले आहे की चॅटबॉट सेवेच्या बीटा आवृत्तीमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. चॅटबॉट सध्या सिक्युरिटी मार्केट, तक्रार निवारण संबंधित प्रश्नांची उत्तरे देतो.
सेबीने जूनमध्ये सारथी ॲप लॉन्च केले होते. या ॲपमध्ये आर्थिक ‘कॅल्क्युलेटर’चा समावेश करण्यात आला आहे. हे KYC प्रक्रिया, म्युच्युअल फंड, ETF, शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी आणि विक्री, गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा आणि ऑनलाइन विवाद निराकरण (ODR) इ. सेवांचा समावेश यात आहे. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना त्यांच्या वैयक्तिक वित्त नियोजनात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले अनेक व्हिडिओ ॲपवर उपलब्ध आहेत.
बाजार नियामक SEBI मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये (AMCs) पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने 1 नोव्हेंबरपासून इनसाइडर ट्रेडिंग नियम लागू करेल. याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.