Post Office: ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम; 5 वर्षात मिळेल 12 लाखांपर्यंत व्याज

Post Office Senior Citizen Savings Scheme: रिटायरमेंट नंतर बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी भरपूर पैसे मिळतात. पण हे पैसे बँक खात्यात राहिल्यास ते हळूहळू खर्च होतात. पण जर पैसे एखाद्या चांगल्या स्कीममध्ये गुंतवले तर तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळू शकतो.
Post Office
Post Office Senior Citizen Savings SchemeSakal
Updated on

Post Office Savings Scheme: रिटायरमेंट नंतर बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी भरपूर पैसे मिळतात. पण हे पैसे बँक खात्यात राहिल्यास ते हळूहळू खर्च होतात. पण जर पैसे एखाद्या चांगल्या स्कीममध्ये गुंतवले तर तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळू शकतो.

तुम्हालाही असे वाटत असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा (Post Office Senior Citizen Savings Scheme) नक्की विचार करवा. सिनिअर सिटीझन्सना या स्कीममध्ये चांगले व्याज दिले जाते.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक डिपॉझिट स्‍कीम आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख गुंतवू शकतात, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे. सध्या, या स्कीमवर 8.2 टक्के व्याज आहे.

तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख जमा करू शकता. जर तुम्ही ही रक्कम या योजनेत गुंतवली तर तुम्हाला 5 वर्षात 8.2% दराने 12 लाख 30 हजार व्याज मिळेल. प्रत्येक तिमाहीत 61,500 व्याज म्हणून जमा केले जातील. अशा प्रकारे, 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 42 लाख 30 हजार मॅच्युरिटी रक्कम मिळेल.

Post Office
SEBI: आता AI देणार शेअर बाजाराशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे; सेबीने SEVA चॅटबॉट केला लॉन्च, असा होणार फायदा

जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या 8.2 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात 6 लाख 15 हजार रुपये व्याज मिळेल. व्याजाची तिमाही आधारावर गणना केल्यास, दर तीन महिन्यांनी 30,750 व्याज मिळेल.

अशाप्रकारे 15 लाख आणि 6 लाख 15 हजारांची व्याजाची रक्कम जोडून एकूण 21 लाख 15,000 रुपये मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळतील.

60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकते. त्याचवेळी व्हीआरएस घेणारे नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि डिफेन्स सेक्टरमधून निवृत्त होणाऱ्या लोकांना काही अटींसह वयात सवलत दिली जाते.

Post Office
SEBI: इनसायडर ट्रेडिंगचे नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार, म्युच्युअल फंड उद्योगात होणार मोठा बदल

ही योजना 5 वर्षांनी मॅच्युअर होते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ 5 वर्षांनंतरही चालू ठेवायचा असेल, तर ठेव रकमेच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही या खात्याचा कालावधी तीन वर्षांसाठी वाढवू शकता. कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ या स्कीममध्ये उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.