Indra Mani Pandey: पहिल्यांदाच एका भारतीय अधिकाऱ्याला मिळाली 'बिमस्टेक'च्या सरचिटणीस पदाची जबाबदारी

Indra Mani Pandey: इंद्रमणी पांडे हे 'बिमस्टेक'चे पुढील सरचिटणीस असतील.
Indra Mani Pandey
Indra Mani PandeySakal
Updated on

Indra Mani Pandey: सात देशांचा समूह असलेल्या 'बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन' (BIMSTEC) चे सरचिटणीसपद प्रथमच एका भारतीय अधिकाऱ्याला मिळाले आहे. इंद्रमणी पांडे हे 'बिमस्टेक'चे पुढील सरचिटणीस असतील.

बिमस्टेक मध्ये सात देश समाविष्ट आहेत - भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पांडे लवकरच पदभार स्वीकारतील.

कोण आहेत इंद्रमणी पांडे?

इंद्रमणी पांडे हे करिअर डिप्लोमॅट आहेत. 1990 मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. पांडे हे 5 सप्टेंबर 2020 पासून जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र (UN) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आहेत. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांसाठी अतिरिक्त सचिव म्हणून काम केले आहे.

Indra Mani Pandey
SBI Card: एसबीआय कार्डने फेस्टिव्ह ऑफरची केली घोषणा, 27.5% पर्यंत मिळेल कॅशबॅक, किती दिवस आहे ऑफर?

इंद्रमणी पांडे यांची कारकीर्द

इंद्रमणी पांडे यांनी ओमानच्या सल्तनतमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. त्यांनी फ्रान्समधील भारताचे उपराजदूत आणि चीनमधील ग्वांगझू येथे भारताचे महावाणिज्यदूत म्हणून काम केले.

पांडे यांनी कैरो (इजिप्त), दमास्कस (सीरिया), इस्लामाबाद (पाकिस्तान) आणि काबुल (अफगाणिस्तान) येथील भारतीय मिशनमध्ये तसेच जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील परिषदेसाठी भारताच्या स्थायी मिशनमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

Indra Mani Pandey
Gold Festive Offers: नवरात्रीत सोन्याच्या दागिन्यांवर मिळतेय मोठी सवलत, जाणून घ्या कोण देतंय किती सूट?

बिमस्टेक’ संघटनेचा उद्देश काय आहे?

जलद आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि समान हिताच्या मुद्द्यांवर समन्वय प्रस्थापित करण्यासाठी सदस्य देशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या संघटनेचा उद्देश आहे. या प्रादेशिक संघटनेची स्थापना 1997 मध्ये करण्यात आली.

सुरुवातीला त्याचे चार सदस्य देश होते. म्यानमारच्या समावेशानंतर त्याचे नाव BIMST-EC झाले. नंतर 2004 मध्ये जेव्हा भूतान आणि नेपाळचा त्यात समावेश झाला तेव्हा त्याचे नाव BIMSTEC झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.