BSE SENSEX : ‘सेन्सेक्स’ ८० हजारांजवळ, ‘निफ्टी’चाही उच्चांक

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने आज प्रथमच ऐतिहासिक ८० हजारांचा टप्पा पार केला, तर ‘निफ्टी’ १६२ अंशांनी वाढून नव्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला.
BSE SENSEX
BSE SENSEX sakal
Updated on

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने आज प्रथमच ऐतिहासिक ८० हजारांचा टप्पा पार केला, तर ‘निफ्टी’ १६२ अंशांनी वाढून नव्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला. जागतिक बाजारातील मजबूत संकेत आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली बँकिंग आणि एफएमसीजी शेअरची जोरदार खरेदी यामुळे निर्देशांकांनी विक्रमी घोडदौड करत नवी शिखरे गाठली. ‘सेन्सेक्स’ने आज दिवसभरात ६३२ अंशांची वाढ नोंदवून प्रथमच ८०,०७४ अंशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. मात्र, दिवसअखेर तो ७९,९८६ अंशांवर बंद झाला.

‘सेन्सेक्स’ने २५ जून रोजी ७८ हजार आणि २७ जून रोजी प्रथमच ७९ हजारांचा टप्पा ओलांडला होता. ‘निफ्टी’ आज दिवसअखेर १६२.६५ अंशांनी वाढून २४,२८६ अंशांच्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला. दिवसभरात, तो १८३ अंशांनी वाढून २४,३०७ अंशांच्या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

‘सेन्सेक्स’वरील प्रमुख ३० शेअरपैकी २४ शेअर वाढले, तर केवळ सहा शेअर घसरले. ‘निफ्टी’वरील ४० शेअर वाढले, तर नऊ घसरले आणि एक स्थिर राहीला. सेन्सेक्सवरील अदानी पोर्ट्सने सर्वाधिक २.४९ टक्क्यांची वाढ नोंदवली. कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील या शेअरमध्येही सर्वाधिक वाढ झाली, तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रो यांच्या शेअरनी घसरण नोंदवली.

कॅलेंडर वर्ष २०२५च्या अखेरीस महागाई दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याच्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांच्या भाष्यामुळे जागतिक बाजारांमध्ये तेजी आली. त्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. भारतीय बँकांचा एकूण एनपीए १२ वर्षांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरल्याने, बँकिंग क्षेत्राचे सामर्थ्य वाढले. त्यामुळे बँका, वित्तीय संस्थांच्या शेअरचीही जोरदार खरेदी झाली. त्यामुळे निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठले.

- अजित मिश्रा,

वरिष्ठ उपाध्यक्ष, रेलिगेअर ब्रोकिंग लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.