Share Market Closing: तेजीसह आजचा शेअर बाजार बंद; Vodafone Idea बनला टॉप गेनर

कोणत्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली अन् कोणत्या शेअर्सनं माती खाल्ली वाचा
Share Market
Share Marketsakal
Updated on

मुंबई : भारतीय शेअर बाजारात केल्या काही दिवसांपासून सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. मेटल सेक्टरमधील शेअर्सच्या लिलावांमुळं स्थानिक शेअर बाजार आज तेजीसह बंद झाला.

यामध्ये सेन्सक्स ८५.३५ अंकांनी म्हणजे ०.१४ टक्क्यांनी ६३,२२८.५१ अकांवर बंद झाला. तर निफ्टी ३९.७५ अंकांनी म्हणजेच ०.२१ टक्क्यांच्या तेजीसह १८,७७५.९० अंकांवर बंद झाला. (Share Market Closing market closed with bullishness Vodafone Idea became top gainer)

Share Market
ShivSena Advertisement: जाहिरात देणारा 'तो' हितचिंतक कोण?; अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची खैरात

आजच्या शेअर बाजारात व्होडाफोन-आयडीआयच्या शेअरमध्ये सुरुवातीला ७ टक्क्यांहून अधिक उसळी पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या शेअर्समध्ये बाऊन्सबॅक आला आहे.

गेलल्या ३ ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरनं १३ टक्के उसळी घेतली आहे. व्होडाफोन-आयडीआयकडून व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी १४,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेअर बाजारातील या शेअरची एकूण स्थिती पाहता कंपनीच्या या प्लॅनला गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स गांभीर्यानं घेत आहेत. (Latest Marathi News)

Share Market
Raj Thackeray Birthday: केदार शिंदे यांनी दोन शब्दातच सांगितलं राज ठाकरे म्हणजे नेमकं काय..

यामध्ये व्हिडोफोन आयडीआय बिझनेस रिव्हाईवलसाठी कंपनी १४ हजार कोटी रुपयांचा फंड इक्विटीच्या माध्यमातून निधी गोळा करु शकते. यामध्ये प्रमोटर्स ABG (आदित्य बिर्ला ग्रुप) आणि व्होडाफोन युके मिळून ७००० कोटी रुपये यात टाकू शकतात.

दरम्यान, टाटा कॉन्झुमरच्या शेअरनं सर्वाधिक ५.१७ टक्क्यांनी उसळी घेतली. तसेच बँक आणि आयटी क्षेत्र सोडून सर्व सेक्टोरल इंडिसेज हिरव्या निशाण्यावर बंद झाला. मेटल, एफएमसीजी, ऑईल अँड गॅस आणि पावर इंडिसेजमध्ये ०.५-१ टक्के तेजीसह बंद झाला. (Marathi Tajya Batmya)

Share Market
CM Relief Fund: "जाहिरातीसाठी पैसा आहे अन्.." CM रिलीफ फंडसाठी एक दिवसाचा पगार, शिंदेंच्या फतव्यामुळे विरोधक भडकले

'या' शेअर्सनं घेतली उसळी

टाटा स्टीलचा शेअर सर्वाधिक २.३९ टक्के, टाटा मोटर्स १.४९ टक्के, पावरग्रीड १.४२ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज १.२८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.०९ टक्के, एनटीपीसी आणि नेस्ले इंडिया ०.९३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, विप्रो, एशियन पेंट्स आणि मारुतीच्या शेअरमध्ये उसळी पहायला मिळाली.

Share Market
ShivSena Advertisement: जाहिरात देणारा 'तो' हितचिंतक कोण?; अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची खैरात

'या' शेअर्सनं खाल्ली माती

सेन्सेक्सवर बुधवारी बजाज फायनान्सचा शेअर सर्वाधिक ०.९८ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. त्याचबरोबर इंडसइंड बँक, एक्सिस बँक, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टायटन, आयटीसी, सन फार्मा, एचडीएफसी बँक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स लाल निशाण्यावर बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()