Demat Account : डी-मॅट खाती १६ कोटींवर; जून महिन्यात ४२ लाखांहून अधिकची भर

‘सीडीएसएल’ आणि ‘एनएसडीएल’ यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये उघडलेल्या डीमॅट खात्यांची संख्या ४२.४ लाखांपेक्षा जास्त आहे.
Demat Account
Demat Account Sakal
Updated on

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली सातत्यापूर्ण खरेदी यामुळे शेअर बाजाराकडे वळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, जून महिन्यात तब्बल ४२ लाखांहून अधिक नवी डी-मॅट खाती उघडण्यात आली आहेत.

हा चार महिन्यांचा उच्चांक असून, देशातील एकूण डी-मॅट खात्यांची संख्या १६ कोटींच्या पुढे पोहोचली आहे. देशातील ‘एनएसडीएल’ आणि ‘सीडीएसएल’ या दोन डिपॉझिटरी संस्थांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

‘सीडीएसएल’ आणि ‘एनएसडीएल’ यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये उघडलेल्या डीमॅट खात्यांची संख्या ४२.४ लाखांपेक्षा जास्त आहे. याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये ३६ लाख आणि गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजेच जून २०२३ मध्ये २३.६ लाख खाती उघडली गेली होती.

एका महिन्यात ४० लाख नवी डी-मॅट खाती उघडण्यात आल्याची ही आतापर्यंची चौथी वेळ आहे.यापूर्वी डिसेंबर २०२३, जानेवारी २०२४ आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने डी-मॅट खाती उघडण्यात आली होती. एकूण डिमॅट खात्यांची संख्या आता १६.२ कोटींहून अधिक झाली आहे.

मे महिन्याच्या तुलनेत त्यात ४.२४ टक्के आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विश्लेषकांच्या मते, केंद्रात तिसऱ्यांदा आलेले भाजप सरकार, त्यामुळे धोरण सातत्याची हमी आणि स्थिरता यामुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे वळण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

Demat Account
Demat Account: शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला; डिमॅट खात्यांच्या संख्येने केला नवा विक्रम

अर्थव्यवस्थेबाबतची सकारात्मक आकडेवारी, दरकपातीची आशा, परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ याचाही सकारात्मक परिणाम शेअर बाजाराला तेजीच्या वारूवर स्वार होण्यासाठी पाठबळ देत आहे.

आयपीओमधूनही चांगला परतावा मिळत आहे, त्यामुळे नवे गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. सध्या करविवरणपत्रे भरण्याचा हंगाम आहे. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवून कर भरण्यामुळे होत असलेले नुकसान भरून काढण्याच्या उद्देशानेही गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत आहे, असे विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.