Garden Reach Shipbuilders : गार्डन रिच शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये 840 कोटीच्या नव्या ऑर्डरनंतर तेजी...

दिवसअखेर तो अडीच टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. गार्डन रीच शिपबिल्डर्सचे शेअर्स मंगळवारी इंट्रा-डेमध्ये 2.07 टक्क्यांनी घसरून 2445.80 रुपयांवर आले.
Shares of Garden Reach Shipbuilders rise after fresh orders worth Rs 840 crore
Shares of Garden Reach Shipbuilders rise after fresh orders worth Rs 840 croreSakal
Updated on

गार्डन रिच शिपबिल्डर्सचे (Garden Reach Shipbuilders) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी दिसून येत आहे. मंगळवारी कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याचे उघड झाले आणि शेअर्समध्ये मोठी वाढ दिसायला लागली. पण त्यानंतर त्यात दिवसभरात 2 टक्क्यांची घसरण झाली.

मात्र, दिवसअखेर तो अडीच टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. गार्डन रीच शिपबिल्डर्सचे शेअर्स मंगळवारी इंट्रा-डेमध्ये 2.07 टक्क्यांनी घसरून 2445.80 रुपयांवर आले. पण, ऑर्डर मिळाल्यानंतर, तो 3.66 टक्क्यांनी वाढून 2589.00 रुपयांवर पोहोचला आहे, पण प्रॉफीट बुकिंगमुळे त्याची किंमत कमी झाली आणि दिवसअखेर तो बीएसईवर 2.51 टक्क्यांच्या मजबूतीसह 2560.25 रुपयांवर बंद झाला.

गार्डन रीच शिपबिल्डर्सना मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेजच्या नॅशनल सेंटर फॉर पोलर एंड ओशन रिसर्चकडून (NCPOR) 840 कोटीयांची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरनुसार गार्डन रीचला ओशन रिसर्च वेसल तयार करायचे आहे. त्याची डिलिव्हरी 42 महिन्यांत करायची आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली.

महिन्याभरात कंपनीचे हे तिसरे यश आहे. यापूर्वी 1 जुलैला बांग्लादेश सरकारसाठी जहाजे बांधण्यासाठी 2.1 कोटी डॉलरचे काँट्रॅक्ट मिळवले होते. याशिवाय, गेल्या महिन्यात 22 जूनला, त्याने मेM/s Carsten Rehder Schiffsmakler and Reederei GmbH and Co. साठी 7500 टन क्षमतेच्या 4-4 मल्टीपर्पज वेसल्स बांधण्याचे कंत्राट मिळाले होते. हा कॉन्ट्रॅक्ट 5.4 कोटी डॉलर्सचा होता.

गेल्या वर्षी 11 ऑगस्ट 2023 रोजी गार्डन रीच शिपबिल्डर्सच्या शेअर्सची किंमत 575 रुपये होती, जी त्याच्या शेअर्ससाठी एका वर्षातील नीचांक आहे. या नीचांक स्तरावरून, 11 महिन्यांत सुमारे 394 टक्क्यांनी झेप घेतली आणि 5 जुलै 2024 रोजी तो 2,834.60 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. सध्या, या उच्च पातळीपासून ते 9 टक्क्यांहून अधिक खाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.