Silicon Valley Bank : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक ही दिवाळखोरीत निघाली आहे. कॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर बँकेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
वाय कॉम्बिनेटर, एक अमेरिकन टेक्नॉलॉजी स्टार्टअप इन्वेस्टर आहेत ज्यांनी हजारो स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यात भारतातील 200 स्टार्टअप्सचा देखील समावेश आहे. दिवळखोरीत निघालेल्या बँकेमुळे वाय कॉम्बिनेटरला देखील मोठा फटका बसला आहे