मुंबई - म्युच्युअल फंडात सिस्टीमॅटिक प्लॅन अर्थात ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीने ऑक्टोबर महिन्यात २५ हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा पार केला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातही २१.६९ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली असून, ऑक्टोबरमध्ये ४१,८८७ कोटी रुपयांचा ओघ आला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.