Income Tax: 'या' ६ उत्पन्न स्त्रोतातून कमावलेल्या कमाईवर इन्कम टॅक्सच नाही! काय आहेत नियम?

असे काही उत्पन्न स्त्रोत आहेत ज्यातून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही.
Income Tax
Income TaxSakal
Updated on

Income Tax: तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर आयकर आकारला जातो. यात केवळ पगाराचा समावेश नाही तर पगाराव्यतिरिक्त बचतीतून मिळणारे व्याज, घरातून मिळणारी कमाई, साईड बिझनेस, भांडवली नफा अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

परंतु असे काही स्त्रोत आहेत ज्यातून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त, इतर अनेक उत्पन्न आहेत जे कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहेत. कर तज्ज्ञांच्या मते, आयकर कायद्याच्या कलम 10 मध्ये अशा करमुक्त उत्पन्नाचा उल्लेख आहे.

2023 च्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अंतर्गत कर स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. यापूर्वी 5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत होती. आता ती वाढवून सात लाख रुपये करण्यात आली आहे.

पगारदारांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय, काही उत्पन्न आहेत ज्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागत नाही. जाणून घ्या अशा उत्पन्नांबद्दल ज्यावर कर लावला जात नाही.

1. शेतीतून मिळणारे उत्पन्न: भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी, आयकर कायदा 1961 मध्ये, शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

जर तुमच्याकडे शेतजमीन असेल आणि तुम्ही शेती किंवा संबंधित कामातून कमाई करत असाल तर तुम्हाला त्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.

2. हिंदू अविभक्त कुटुंबाकडून (HuF) मिळालेली रक्कम: हिंदू अविभक्त कुटुंब (HuF) कडून मिळालेली रक्कम किंवा वारसाच्या स्वरूपात मिळकत आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे. अशा उत्पन्नाला आयकर कायद्याच्या कलम 10(2) अंतर्गत करमुक्त आहे.

या कलमात असे म्हटले आहे की, कुटुंबाचे उत्पन्न, स्थावर मालमत्तेचे उत्पन्न किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नाही.

3. बचत खात्यातील व्याज: तुम्हाला तुमच्या बचत खात्यातील रकमेवर दर तिमाहीला व्याज मिळते. आयकर कायद्यानुसार हे तुमचे उत्पन्न आहे.

यावर, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80TTA नुसार आयकर सूट मिळू शकते. जर बचत खात्यावरील व्याज 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्तीच्या रकमेवर आयकर भरावा लागेल.

4. ग्रॅच्युइटीवर कर सूट: जर एखादा कर्मचारी केंद्र किंवा राज्य सरकारसाठी काम करत असेल तर त्याला मिळणारी ग्रॅच्युइटी पूर्णपणे करमुक्त असते.

मात्र, खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍याला जेव्हा  Token of Appreciation मिळते, तेव्हा त्यासाठीचे कर नियम वेगळे असतात.

Income Tax
RBI Governor: कर्ज फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाने RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांना बजावली नोटीस, काय आहे प्रकरण?

5. VRS वर मिळालेली रक्कम: (Voluntary Retirement Scheme) स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना प्राप्तिकर कायद्याच्या नियम 2BA अंतर्गत, VRS म्हणून पाच लाख रुपयांपर्यंत मिळालेली रक्कम करमुक्त आहे.

6. शिष्यवृत्ती, पुरस्कार: जर एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती किंवा पुरस्कार प्राप्त झाला ज्यातून तो अभ्यासाचा खर्च चालवत असेल, तर त्याला आयकर कायद्याच्या कलम 10 (16) अंतर्गत प्राप्तिकरातून सूट मिळते. यामध्ये रकमेची मर्यादा नाही.

Income Tax
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.