New Financial Year : अल्पबचत योजनांचे व्याजदर एप्रिल-जून तिमाहीसाठी ‘जैसे थे’

नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे दर ‘जैसे थे’ राहतील, असे सरकारने आज जाहीर केले.
New Financial Year
New Financial Year sakal
Updated on

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे दर ‘जैसे थे’ राहतील, असे सरकारने आज जाहीर केले. एक एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या आणि ३० जून २०२४ रोजी संपणाऱ्या नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर चालू आर्थिक वर्षाच्या एक जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या चौथ्या तिमाहीसाठी अधिसूचित केलेल्या व्याजदरांप्रमाणेच राहतील, असे अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

New Financial Year
Jamnalal Bajaj Award : ‘पीएनजी सन्स’ला जमनालाल बजाज पुरस्कार

या अधिसूचनेनुसार, सुकन्या समृद्धी योजनेतील ठेवींवर ८.२ टक्के व्याज मिळेल, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवरील दर ७.१ टक्के राहील. पीपीएफ आणि बचत ठेवींवरील व्याजदरदेखील अनुक्रमे ७.१ टक्के आणि चार टक्के राहील. किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल आणि गुंतवणूक ११५ महिन्यांत परिपक्व होईल.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठी (एनएससी) व्याजदर ७.७ टक्के राहील. मासिक उत्पन्न योजनेसाठी ७.४ टक्के दर राहील. सरकार दर तिमाहीला अल्पबचत योजनांवरील व्याजदर अधिसूचित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.