Koo Shut Down: भारतीय ट्विटर 'कु'ला लागली घरघर; लवकरच बंद होणार ॲप, काय आहे कारण?

Koo Shut Down: सोशल मीडिया स्टार्टअप 'कू'ने भारताचे ट्विटर म्हणून 4 वर्षांपूर्वी आपली सेवा सुरू केली होती, ती आता बंद होणार आहे. संपादनासाठी प्रदीर्घ चर्चा अयशस्वी झाल्यानंतर कूच्या सेवा बंद केल्या जात आहेत.
Koo Shut Down
Koo Shut DownSakal

Koo Shut Down: सोशल मीडिया स्टार्टअप 'कू'ने भारताचे ट्विटर म्हणून 4 वर्षांपूर्वी आपली सेवा सुरू केली होती, ती आता बंद होणार आहे. संपादनासाठी प्रदीर्घ चर्चा अयशस्वी झाल्यानंतर कूच्या सेवा बंद केल्या जात आहेत. कूचे सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी 3 जुलै रोजी एका लिंक्डइन पोस्टमध्ये सांगितले, आम्ही अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या, समूह आणि मीडिया हाऊससह भागीदारी करण्याची शक्यता तपासली. परंतु या चर्चेने आम्हाला हवे तसे परिणाम दिसत नाहीत.

त्यांच्यापैकी काहींनी भागीदारीवर स्वाक्षरी करण्यासाठी प्राधान्यक्रम बदलले. आम्हाला ॲप चालू ठेवायचे असले तरी, सोशल मीडिया ॲप चालू ठेवण्यासाठी तंत्रज्ञान सेवांची किंमत जास्त आहे आणि आम्हाला हा कठीण निर्णय घ्यावा लागला.

Koo Shut Down
Share Market Opening: शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

स्टार्टअपने आतापर्यंत 65 दशलक्ष डॉलर निधी उभारला

टायगर ग्लोबलच्या कू स्टार्टअपने आतापर्यंत Accel, 3one4 कॅपिटल, नवल रविकांत, बालाजी श्रीनिवासन, कलारी कॅपिटल आणि इतर अनेकांकडून 65 दशलक्ष डॉलर निधी जमा केला आहे.

Koo ही 2020 मध्ये लाँच करण्यात आली आणि ती पहिली भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट होती, जी 10 भाषांमध्ये उपलब्ध होती. ॲप लाँच झाल्यापासून जवळपास 6 कोटी लोकांनी डाउनलोड केले होते. लॉन्च झाल्यावर, कूला अनेक सेलिब्रिटी आणि मंत्र्यांनी प्रमोट केले.

Koo Shut Down
Tata Group: टाटा अमरावतीमध्ये उभारणार दक्षिण आशियातील सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार

भारतात लाँच केल्यानंतर, कू ने नायजेरिया आणि ब्राझीलमध्ये सेवांचा विस्तार केला. आणि निधी उभारण्यास अडथळे आल्यामुळे स्टार्टअप अडचणीत आला आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढावे लागले. एका अहवालानुसार, संस्थापकांना कर्मचाऱ्यांचे पगार स्वत:च्या खिशातून द्यावे लागत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com