South Indian Bank Share : साउथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये तेजी, 2 वर्षात 300% परतावा...

बिझनेस ट्रांसफॉर्मेशनमुळे बिझनेस परफॉर्मंसमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. बँकेच्या 948 ब्रांच आणि 1315 एटीएमचे नेटवर्क आहे.
South Indian Bank
South Indian BankSakal
Updated on

साउथ इंडियन बँकेने (South Indian Bank) गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बिझनेस ट्रांसफॉर्मेशनमुळे बिझनेस परफॉर्मंसमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. बँकेच्या 948 ब्रांच आणि 1315 एटीएमचे नेटवर्क आहे.

हा शेअर सध्या 30 रुपयांवर ट्रेड करत आहे. आयसीआयसीआय डायरेक्टने पुढील 12 महिन्यांसाठी हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरने 2 वर्षात 300 टक्के परतावा दिला आहे. तर बँक येत्या 2 मे रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.

बँकेचे टारगेट आता एमएसएमई आणि रिटेल पोर्टफोलिओवर आहे, ज्यामुळे मार्जिन सुधारेल असे आयसीआयसीआय डायरेक्टने आपल्या अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2024-2026 दरम्यान सरासरी लोन ग्रोथ 13% अपेक्षित आहे.

या कालावधीत इंटरेस्ट मार्जिन 3.2-3.3% दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. राईट इश्यूच्या माध्यमातून 1151 कोटीचा फंड उभारण्यात आला आहे. यामुळे बॅलेन्सशीट मजबूत होईल. बँकेचा बिझनेस आउटलूक चांगला दिसत असून पुढील 12 महिन्यांचे टारगेट 35 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

हा शेअर सध्या 30 रुपयांवर ट्रे़ड करत आहे. अशा परिस्थितीत, टारगेट प्राइस सुमारे 17-18 टक्के जास्त आहे. या आठवड्यात स्टॉक 11-12% वाढला आहे. हा शेअर 5 ट्रेडिंग सत्रांपासून सतत वाढत आहे.

2 फेब्रुवारीला साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्सने 40 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मार्च महिन्यातील करेक्शनमध्ये, 14 तारखेला तो 25 रुपयांवर घसरला होता. 19 एप्रिलला त्याने 27 रुपयांचा नीचांक गाठला, पण यानंतर शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे.

या शेअरने यावर्षी आतापर्यंत 23 टक्के, सहा महिन्यांत 40 टक्के, एका वर्षात 110 टक्के आणि दोन वर्षांत 305 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.