Sovereign Gold Bond: स्वस्त सोने खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस; किती आहे किंमत?

Sovereign Gold Bond: सॉव्हरिन गोल्ड बाँड मालिका IV 16 फेब्रुवारी रोजी बंद होत आहे, म्हणजे त्यात गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये तुम्ही 6,263 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोने खरेदी करू शकता.
Sovereign Gold Bond Scheme 2023-24 New series opens for subscription at rs 6,263/gm
Sovereign Gold Bond Scheme 2023-24 New series opens for subscription at rs 6,263/gmSakal
Updated on

Sovereign Gold Bond: सॉव्हरिन गोल्ड बाँड मालिका IV 16 फेब्रुवारी रोजी बंद होत आहे, म्हणजे त्यात गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये तुम्ही 6,263 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोने खरेदी करू शकता. सॉव्हरिन गोल्ड बाँडद्वारे, तुम्हाला 24 कॅरेटच्या 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी सरकारकडून दिली जाते. हे बाँड आरबीआयने जारी केले आहेत. (Sovereign Gold Bond Scheme 2023-24: New series ends today)

ऑनलाइन पेमेंटवर मिळेल सूट

सरकारने एका ग्रॅमची किंमत 6,263 रुपये निश्चित केली आहे. SGB ​​2023-24 मालिका IV ची इश्यू किंमत 6,263 रुपये आहे. ऑनलाइन पेमेंट करून तुम्ही 50 रुपये वाचवू शकता. ऑनलाइन पेमेंट केल्यावर इश्यूची किंमत 6,213 रुपये असेल. यावर तुम्ही फक्त 1 ग्रॅम सोने देखील खरेदी करू शकता. (Sovereign Gold Bond Scheme 2024)

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची मॅच्युरिटी  8 वर्षे आहे. 5 व्या वर्षी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 2.50 टक्के व्याज मिळते. त्याचे पेमेंट दर 6 महिन्यांनी केले जाते. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2015 मध्ये सुरू झाली. ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे त्या बँकेतूनही तुम्ही गोल्ड बाँड खरेदी करु शकता.

सॉव्हरिन गोल्ड बाँडचे फायदे काय आहेत?

  • सॉव्हरिन गोल्ड बाँडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात तुम्हाला दुप्पट नफा मिळतो. गुंतवणूकदाराला बाजार दरानुसार पैसे मिळतात आणि दुसरे म्हणजे, ग्राहकांना 2.5% व्याज देखील दिले जाते.

  • जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याच्या सुरक्षेची काळजी करावी लागते, पण SGB मध्ये सुरक्षेचा ताण नसतो.

  • याशिवाय ते GST च्या कक्षेत येत नाही, भौतिक सोन्यावर 3% GST आकारला जातो.

  • गुंतवणूकदारांनी ऑनलाइन पेमेंटद्वारे सॉव्हरिन गोल्ड बाँड खरेदी केल्यास, त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.