Investment Tips: सार्वभौम सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करणं फायद्याचं की दागिन्यांमध्ये, काय सांगतात तज्ञ?

Investment Tips: कुठे गुंतवणूक करणे योग्य आहे?
Investment Tips
Investment TipsSakal
Updated on

Sovereign Gold Bond Scheme: तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर सार्वभौम सुवर्ण रोख्यात (SGB) गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी आहे. सार्वभौम सुवर्ण रोख्यात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. RBI ने सार्वभौम सुवर्ण रोखे (SBG) योजनेंतर्गत ऑफलाइन गोल्ड बाँडची किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे.

ऑनलाइन खरेदी केल्यावर, तुम्हाला प्रति 10 ग्रॅमवर 50 रुपये अतिरिक्त सूट मिळेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ऑनलाइन सार्वभौम सुवर्ण रोखे (SBG) योजनेमध्ये खरेदी केली तर तुम्हाला 5,873 रुपये शुल्क भरावे लागेल.

सोने केवळ महागाईवर मात करण्यास मदत करत नाही तर गुंतवणुकीची जोखीम देखील कमी करते. सोने खरेदी करण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही सोन्याचे दागिने बनवू शकता किंवा सार्वभौम सुवर्ण रोखेमध्ये गुंतवणूक करू शकता.

आता प्रश्न असा आहे की या दोन गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी कुठे गुंतवणूक करणे योग्य आहे? दागिने की सार्वभौम सुवर्ण रोख्यात.

सार्वभौम सुवर्ण रोखे ही सरकारी सुवर्ण रोखे योजना आहे. सरकारच्या या योजनेद्वारे बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळते. तुम्हाला सोने मिळणार नाही, उलट तुम्हाला तुमच्या सोने खरेदीची पावती मिळेल. सोने सरकारकडे राहील. या योजनेद्वारे कोणताही भारतीय नागरिककिमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलो सोन्यात गुंतवणूक करू शकतो.

आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याचे दागिने खरेदी करण्यापेक्षा सार्वभौम सुवर्ण रोख्यात पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर आहे.

तुम्हाला 2.5 टक्के परतावा मिळेल

सार्वभौम सुवर्ण रोख्यात खरेदी केलेल्या सोन्यावर सरकार दरवर्षी 2.5 टक्के दराने व्याज देते. सोन्याचे दागिने विकत घेतल्यास व्याज मिळणार नाही. सोन्याचे भाव वाढले तरच फायदा होईल. तर सार्वभौम गोल्ड बाँडचे अनेक फायदे आहेत.

चोरीची भीती नाही

ते लपवण्याची किंवा भौतिक सोन्याप्रमाणे लॉकरमध्ये ठेवण्याची गरज नाही. म्हणजे हे सोने चोरीला जाण्याचा धोका नाही. सार्वभौम सुवर्ण रोख्यात सर्व काही डिजिटल स्वरूपात आहे.

Investment Tips
Samhi Hotels IPO: पैसे तयार ठेवा! साम्ही हॉटेलचा IPO 14 सप्टेंबरला होणार खुला, किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

कोणतेही मेकिंग चार्ज नाही, जीएसटी नाही

सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस लागू होतात. तुम्हाला सार्वभौम सुवर्ण रोख्यात काणताही खर्च लागत नाही आणि तुमचे पैसे वाचतात.

अधिक तरलता

सार्वभौम सुवर्ण रोखे कधीही विकू शकता. यात भौतिक सोन्यापेक्षा जास्त तरलता आहे. दागिने विकायला थोडा वेळ लागतो आणि कधी कधी दागिने विकून कमी पैसे मिळतात.

Investment Tips
भारताच्या ऑटो मार्केटमध्ये पेट्रोल, डिझेलचे वर्चस्व, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठी घसरण, काय आहे आकडेवारी?

शुद्धतेची चिंता नाही

सार्वभौम सुवर्ण रोख्यात तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही ते खरेदी करता तेव्हा तुम्हाला सोन्याची नव्हे तर डिजिटल पावती मिळेल, त्यामुळे ते विकताना त्याची शुद्धता तपासावी लागणार नाही. त्याचबरोबर सोन्याचे दागिने खरेदी करताना शुद्धतेबाबत अनेक अडचणी निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.