Sovereign Gold Bonds Scheme: आजपासून स्वस्त सोने खरेदीची सुवर्ण संधी, जाणून घ्या किंमतीसह पूर्ण माहिती एका क्लिकवर

आजपासून तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Sovereign Gold Bonds Scheme
Sovereign Gold Bonds SchemeSakal
Updated on

Sovereign Gold Bonds Scheme: आजपासून तुम्हाला सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) सीरिज अंतर्गत स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे सुवर्ण रोखे 23 जूनपर्यंत खुले असतील.

तुमच्याकडे त्यात गुंतवणूक करण्यासाठी फक्त 5 दिवस आहेत. सार्वभौम सुवर्ण रोखेमध्ये, गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक केली जाते.

किंमत किती आहे?

भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे सीरिजसाठी 5,926 रुपये किंमत निश्चित केली आहे. हे प्रत्यक्ष किंवा ऑफलाइनद्वारे खरेदी करण्यासाठी आहे आणि जर तुम्ही हे सुवर्ण रोखे ऑनलाइन पद्धतीने खरेदी केले तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल.

अशा प्रकारे 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,876 रुपये मोजावे लागतील. सार्वभौम सुवर्ण रोखेद्वारे, तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची गुंतवणूक करू शकता.

ऑनलाइन खरेदीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट

डिजीटलद्वारे सुवर्ण रोखेसाठी अर्ज करणार्‍या आणि पेमेंट करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी सबस्क्रिप्शनची किंमत 50 रुपये प्रति ग्रॅमने कमी असेल. गुंतवणूकदारांना निश्चित मूल्यावर सहामाही आधारावर वार्षिक 2.50 टक्के व्याज दिले जाईल.

सार्वभौम सुवर्ण रोखेचा कालावधी आठ वर्षांचा असेल आणि पाच वर्षानंतर, ग्राहकांना त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय असेल. या बाँड्सचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे आणि लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे, त्यामुळे त्याची मुदतपूर्व पूर्तता 5 वर्षांनंतर आणि 8 वर्षानंतर पूर्ण होऊ शकते.

Sovereign Gold Bonds Scheme
Farmer Home Loan: शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी मिळणार 50 लाखांपर्यंतचे कर्ज; असा करा अर्ज?

सुवर्ण रोखे कोठे खरेदी करू शकता?

गुंतवणूकदार हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे खरेदी करू शकतात. तुम्ही स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेकडून ते खरेदी करू शकत नाही.

कोण गुंतवणूक करू शकतो?

हे रोखे केवळ भारतीय निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था खरेदी करू शकतात.

वैयक्तिक गुंतवणूकदार एका वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकतात. याशिवाय, ट्रस्ट किंवा संस्था एका वर्षात जास्तीत जास्त 20 किलोचे रोखे खरेदी करू शकतात.

Sovereign Gold Bonds Scheme
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.