Spicejet lay off: स्पाइसजेटचा मोठा निर्णय! 1,400 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; काय आहे कारण?

SpiceJet lay off: खर्चात कपात करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी स्पाइसजेट 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. ही कपात कंपनीत काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के असेल.
SpiceJet to lay off 1,400 employees in cost-cutting measure
SpiceJet to lay off 1,400 employees in cost-cutting measure Sakal
Updated on

SpiceJet lay off: खर्चात कपात करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी स्पाइसजेट 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. ही कपात कंपनीत काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के असेल. एअरलाइनमध्ये सध्या 9,000 कर्मचारी आहेत आणि सुमारे 30 विमाने कार्यरत आहेत. (SpiceJet to lay off 1,400 employees in cost-cutting measure)

स्पाइसजेट अनेक महिन्यांपासून पगार देण्यास विलंब करत आहे. अनेकांना जानेवारीचे पगार अद्याप मिळालेले नाहीत. 60 कोटी रुपयांच्या पगाराच्या बिलाचा बोजा असल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

निधीची समस्या भेडसावत असलेल्या स्पाइसजेटला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देता येत नसल्याने कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कंपनी काही गुंतवणूकदारांकडून 2200 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. (SpiceJet plans layoffs to stay afloat amid financial woes)

गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव आहे. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार बिल 60 कोटी रुपये आहे. हे कमी करण्यासाठी एअरलाइन्स मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीच्या तयारीत आहे.

SpiceJet to lay off 1,400 employees in cost-cutting measure
Rozgar Mela: पीएम मोदींनी रोजगार मेळाव्यात एक लाख नियुक्ती पत्रांचे केले वाटप; 'या' विभागांमध्ये होणार भरती

स्पाईसजेट कर्मचारी कपातीची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा जगभरात कर्मचारी कपातीच्या प्रमाणात वाढ होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून कर्मचारी कपातीचा वेग वाढला आहे. ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, सिस्को यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

SpiceJet to lay off 1,400 employees in cost-cutting measure
Paytm: पेटीएम पेमेंटच्या अडचणीत मोठी वाढ; चीनशी असलेल्या कनेक्शनचा सरकार करणार तपास

जगभरात सुरू असलेल्या कपातीचा सर्वात जास्त परिणाम टेक कंपन्यांवर होत आहे. एका अहवालानुसार, जानेवारीमध्ये टेक कंपन्यांनी 32 हजारांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.