Gold Price: सोन्याच्या भावाने केला नवा विक्रम; आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड पहिल्यांदाच 2500 डॉलरवर

Gold Price Rise: सोन्याचा भाव सातत्याने नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे. आता सोन्याने आणखी एक नवीन विक्रम केला आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या भावाने प्रथमच 2,500 प्रति औंस डॉलरची पातळी गाठली आहे.
Gold Price Rise
Gold Price RiseSakal
Updated on

Gold Price Rise: सोन्याचा भाव सातत्याने नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे. आता सोन्याने आणखी एक नवीन विक्रम केला आहे. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या भावाने प्रथमच 2,500 प्रति औंस डॉलरची पातळी गाठली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोन्याचा भाव शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात 2,500 प्रति औंस डॉलरवर पोहोचला. अशा प्रकारे, सोन्याने गेल्या महिन्यात केलेला विक्रम मोडला.

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करेल या अपेक्षेने सध्या सोन्याचे भाव वाढत आहेत. असे मानले जाते की फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात होणाऱ्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीत व्याजदर कमी करण्यास सुरुवात करू शकते. व्याजदर कमी झाल्यास गुंतवणूकदार पर्याय शोधू लागतील, ज्याचा फायदा सोने आणि इतर मौल्यवान धातूंना होऊ शकेल.

Gold Price Rise
SEBI: सेबी प्रमुख माधबी पुरी बुच पुन्हा अडचणीत; हिंडनबर्ग नंतर आता नव्या रिपोर्टने उडाली खळबळ

अमेरिकेतील आर्थिक डेटा फेडरल रिझर्व्हसाठी व्याजदर कमी करण्यासाठी परिस्थिती निर्माण करत आहे. प्रथम, बेरोजगारीच्या प्रचंड वाढीमुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडण्याची भीती होती.

आता गृहनिर्माण क्षेत्राचे आकडे गडबडले आहेत. हे सर्व आकडे अशी परिस्थिती निर्माण करत आहेत की फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याचा निर्णय अधिक काळ पुढे ढकलू शकत नाही.

पश्चिम आशियातील तणाव वाढला

सोन्यासाठी स्वस्त व्याजदराचा कालावधी चांगला मानला जातो. जेव्हा व्याजदर जास्त राहतात, तेव्हा गुंतवणूकदार जास्त परताव्याच्या शोधात बाँडकडे वळतात. व्याजदर कमी झाल्यावर ते सोने खरेदी करू लागतात.

Gold Price Rise
RBIची मोठी कारवाई! बँक ऑफ महाराष्ट्रसह हिंदुजा लेलँड फायनान्स आणि पूनावाला फिनकॉर्पला ठोठावला दंड; कारण काय?

यापूर्वी जागतिक अनिश्चिततेचा आधार सोन्याला मिळत होता. पश्चिम आशियातील तणाव वाढल्याने सोन्याच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. युद्ध आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदार सोने खरेदीला सुरक्षित गुंतवणूक मानून खरेदी करू लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.