Success Story: कोरोनात सुरु केलं YouTube चॅनेल अन् पालटलं 24 वर्षीय मुलाचं नशीब, दिवसाला कमावतोय 2 लाख

इंस्टाग्रामवर त्याचे 42 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत
Success Story
Success StorySakal
Updated on

Success Story: सौरव जोशीचे वय अवघे 24 वर्षे आहे. पण, Vloggingच्या जगात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यूट्यूबवर सौरवच्या चॅनलचे 21 दशलक्षाहून अधिक सबस्क्राईबर आहेत. इन्स्टाग्रामवरही फॉलोअर्सची मोठी संख्या आहे.

सौरव जोशी याचा जन्म 9 सप्टेंबर 1999 रोजी कौसानी या छोट्या गावात झाला. हे गाव उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यात आहे. 1997 मध्ये त्याचे वडील कामाच्या शोधात दिल्लीत आले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.

त्याचे वडील रात्रंदिवस काम करायचे. सौरव व्यतिरिक्त, कुटुंबात वडील, आई हेमा जोशी, भाऊ साहिल आणि चुलत भाऊ पियुष, आजोबा आणि आजी आहेत.

दिल्लीत काही वर्षे घालवल्यानंतर सौरव जोशीचे वडील हरियाणातील हसी शहरात गेले. येथे आल्यानंतर त्यांनी घरांमध्ये पीओपीचे काम सुरू केले. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते.

त्यांना सारखे घर बदलावे लागत असे. सुमारे 9 घरे बदलल्यानंतर त्यांनी स्वतःचे घर घेतले. त्यामुळे सौरवने बारावीपर्यंत 5 शाळा बदलल्या होत्या.

सौरव जोशी अभ्यासात ठीक होता. इंटरमिजिएटमध्ये त्याचे मार्क्स फारसे चांगले नव्हते. यानंतर त्याला भविष्याची चिंता वाटू लागली. लोकांनी डिझायनिंग आणि आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. तयारीसाठी तो दिल्लीला गेले.

सौरव जोशी याची चित्रकलेची आवड खूप वाढली होती. दिल्लीत एक वर्ष प्रशिक्षण घेऊनही त्याची आर्किटेक्चरमध्ये निवड झाली नाही.

तो घरी परत आला. त्याने वडिलांसोबत पीओपी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, चित्र काढण्याची त्याची आवड कायम राहिली. तो फावल्या वेळात चित्र काढायचा.

youtube चा प्रवास सुरु झाला:

सौरवचे रेखाचित्र पाहून त्याच्या भावाने सुचवले की तो यूट्यूबवर व्हिडिओ का बनवत नाही. यानंतर त्याने कलेशी संबंधित एक चॅनल तयार केले.

2017 मध्ये त्याने पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर हे चक्र सुरूच राहिले. यादरम्यान चॅनलचे नावही अनेक वेळा बदलण्यात आले. कालांतराने त्याचे नाव सौरव जोशी आर्ट्स ठेवण्यात आले. मात्र, त्याचा परिणाम फारसा चांगला झाला नाही. पण, त्याने हार मानली नाही.

Success Story
Finances Report: PM मोदींच्या गुजरातवर 3.40 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा, कॅगने सरकारला दिला इशारा

त्यानंतर व्लॉग चॅनल तयार केले:

यानंतर सौरवने एक व्लॉग चॅनल बनवला. यामध्येही त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. पण, त्याने धीर सोडला नाही. तिसऱ्या प्रयत्नात, तो त्याच्या व्लॉगिंग चॅनेल खात्यावर कमाई करण्यात यशस्वी झाला.

सुरुवातीला व्लॉगिंगला प्रतिसादही चांगला नव्हता. त्यानंतर लॉकडाऊन दरम्यान, एके दिवशी त्याने संपूर्ण कुटुंबासह चित्र काढण्याचा व्हिडिओ अपलोड केला. याला उदंड प्रतिसाद मिळाला.

यानंतर सौरवने मागे वळून पाहिले नाही. त्याचे यूट्यूब चॅनल सौरव जोशी व्लॉग्सचे आज 21 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. त्यानी व्लॉगिंग हा त्याचा पूर्णवेळ व्यवसाय केला आहे.

इंस्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. सौरवचे 42 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आज तो सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आज सौरभ जोशी दररोज दीड ते दोन लाख रुपये कमावतो.

Success Story
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.