Dunzo Crisis: डिलिव्हरी स्टार्टअप कंपनी डन्झोने कर्मचार्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला डन्झो कंपनीने रेव्हेन्यू फायनान्सिंग फर्म वनटॅपशी करार केला होता. पण तरीही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले की, "आम्हाला आमच्या गुंतवणूकदारांकडून आश्वासन मिळाले आहे की पुढील आठवड्याच्या सुरुवातीला आम्हाला आवश्यक निधी पाठवला जाईल. आम्हाला निधी मिळताच आम्ही नोव्हेंबरचे वेतन जाहीर करू''
डन्झोने कर्मचार्यांना जुलै 2023 पर्यंत पगार देण्यास उशीर केला होता. त्यात कंपनीने शेकडो कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे आणि कंपनीने कार्यालयाची जागा देखील रिकामी केली आहे. डन्झोच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांच्या दोन सह-संस्थापकांसह अनेक उच्च अधिकार्यांनी कंपनी सोडली आहे.
डन्झोला FY23 मध्ये 1,802 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये झालेल्या नुकसानापेक्षा हे नुकसान 288 टक्के अधिक आहे. खर्चात जवळपास चार पट वाढ झाल्यामुळे डंझोला FY22 मध्ये 464 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कंपनीचा एकूण खर्च 2023 च्या आर्थिक वर्षात 4 पटीने वाढून 2,054 कोटी रुपये झाला आहे.
जुलै महिन्यात थकबाकी न भरल्याबद्दल 7 कंपन्यांनी डन्झोला नोटिसा पाठवल्या होत्या. फेसबुक इंडिया ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (फेसबुक इंडिया) आणि बेंगळुरूस्थित सॉफ्टवेअर सल्लागार कंपनी निलेन्सो यांनीही डंझोला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
या कंपनीची दुसरी सर्वात मोठी गुंतवणूकदार असलेल्या गुगलनेही कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून थकबाकी भरण्यास सांगितले होते. यावरून डन्झोची अवस्था किती वाईट आहे याचा अंदाज येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.