Ashneer Grover On GST: ऑनलाइन गेमिंगवर 28% GST लावल्यानंतर अश्नीर ग्रोवरचा संताप, ट्वीट करत म्हणाला...

सरकारच्या या निर्णयानंतर गेमिंग उद्योगातील अनेक दिग्गजांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त केला आहे.
Ashneer Grover
Ashneer GroverSakal
Updated on

Ashneer Grover Reaction on Online Gaming GST: जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर गेमिंग उद्योगातील अनेक दिग्गजांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त केला आहे.

यामध्ये, BharatPe चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे आणि ट्विटद्वारे टीका केली आहे.

अशनीर ग्रोव्हरची जीएसटी कौन्सिलच्या निर्णयावर जोरदार टीका

भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याच्या GST परिषदेच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी तो म्हणाला की, ''स्टार्टअप संस्थापकांना यावेळी सक्रियपणे राजकारणात प्रवेश करावा लागेल आणि त्यांचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करावे लागेल, अन्यथा सरकार इतर उद्योगांबाबतही असेच करेल''

अश्नीर ग्रोव्हरने आपल्या ट्विटमध्ये काय लिहिले आहे

अश्नीर ग्रोव्हरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की- "RIP- भारतातील रिअल मनी गेमिंग उद्योग. जर खेळाडूने ₹54 जिंकले (प्लॅटफॉर्म फी नंतर)- त्यावर ते 30% TDS भरतील.

फँटसी गेमिंग उद्योगाचा एक भाग बनणे मजेदार होते, ज्याची आता हत्या झाली आहे. स्टार्टअप्सच्या संस्थापकांसाठी राजकारणात प्रवेश करण्याची आणि प्रतिनिधित्व करण्याची वेळ आली आहेर आहे.

Ashneer Grover
GST Council: ऑनलाईन गेमिंगवर लागणार २८% कर, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटीत कपात

अश्नीर ग्रोव्हरने ऑनलाइन गेमिंग उद्योगात प्रवेश केला आहे

अश्नीर ग्रोव्हरने अलीकडेच त्याचे क्रिकपे नावाचे गेमिंग अॅप लाँच केले आहे. या गेममध्ये, वापरकर्त्यांना व्हर्च्युअल टीम तयार करण्याची, सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची, स्पर्धेत सहभागी होण्याची आणि त्यांच्या खेळाच्या कामगिरीवर आधारित गुण मिळविण्याची सुविधा देखील मिळते.

GST कौन्सिलचा काय निर्णय आहे

जीएसटी कौन्सिलने काल निर्णय घेतला आहे की ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो, हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येईल. यामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगाला मोठा धक्का बसेल, ज्याला 2027 पर्यंत 25,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती.

तसेच ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतींना जुगार आणि सट्टेबाजीप्रमाणे कारवाई करता येणार नाही याची खात्री करण्यासाठी जीएसटी कायद्यात आवश्यक बदल केले जातील.

Ashneer Grover
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()